देशात मुस्लिमांच्या विरोधात, सौदी–दुबईत मात्र पाहुणचार, ममता बॅनर्जी यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

देशात मुस्लिमांच्या विरोधात, सौदी–दुबईत मात्र पाहुणचार, ममता बॅनर्जी यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

हिंदुस्थानात असताना सतत मुस्लीम समाजाच्या विरोधात बोलायचे. परंतु पश्चिमी देश सौदी अरब आणि दुबईत गेल्यानंतर मात्र मुस्लीम नेत्यांकडून पाहुणचार घ्यायचा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दुटप्पीपणा आहे, अशा शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी यांच्यावर तोफ डागली. मोदी आणि भाजप नेत्यांकडून सतत द्वेष पसरवला जात आहे, असा गंभीर आरोपसुद्धा ममता बॅनर्जी यांनी केला.

देशात असताना मोदी वेगळेच बोलतात, तर विदेशात पाहुणचार घेत असताना ते वेगळेच बोलतात. या लोकांकडून आता यूसीसी आणायचे प्रयत्न सुरू आहेत. आज जे काही तुमच्याविरोधात होत आहे ते उद्या सर्वांच्या बाबतीत होईल, असे ममता या वेळी म्हणाल्या. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद हिंसाचार भडकवण्याचे काम भाजपकडून केले जात आहे. उत्तर प्रदेश, बिहारमधील व्हिडीओ दाखवून पश्चिम बंगालला अस्थिर करण्याचे प्रयत्न भाजपकडून केले जात आहे, असा आरोप ममता यांनी केला. राज्याच्या सीमा सुरक्षित ठेवणे हे बीएसएफची जबाबदारी आहे. केंद्र सरकार आपले अपयश झाकण्याचे काम करत आहे. पेट्रोलच्या किमती वाढल्या आहेत. परंतु काही लोक केवळ बंगालविरोधात बोलत आहेत. जर तुमच्यात हिम्मत असेल तर माझ्यासमोर येऊन बोला, असे थेट आव्हान ममता बॅनर्जी यांनी भाजप नेत्यांना केले.
इंडिया आघाडीला आवाहन

ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीला आवाहन केले. एकत्रित राहा. भाजपच्या हुकूमशाहीविरोधात हिंमत करून लढाई लढा. सध्या जे काही होत आहे तो आमचा खासगी विषय नाही. भाजपकडून होत असलेल्या तुष्टीकरणाचा सर्वांवर परिणाम होत आहे. आज मुस्लिमांविरोधात होत असेल तर उद्या अन्य दुसऱया समाजासोबत होईल. त्यामुळे सर्वांना भाजपा विरोधात एकजुटीने लढाई लढावी लागणार आहे. असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वक्फ बोर्डाच्या विधेयकास विरोध का केला? उद्धव ठाकरे यांनी सांगितले कारण वक्फ बोर्डाच्या विधेयकास विरोध का केला? उद्धव ठाकरे यांनी सांगितले कारण
संसदेत संमत झालेल्या वक्फ बोर्डाच्या विधेयकास शिवसेना उबाठाने विरोध केला होता. त्यानंतर शिवसेना उबाठावर टीका होऊ लागली होती. शिवसेना कामगार...
Jain Community Protest : जैन समाजाचा आजपर्यंत कधी आवाज ऐकला होता का? वर्षा गायकवाड यांचा सवाल
जेवण नव्हतं, 2oवर्ष फक्त 500 रुपयांवर हॉटेलमध्ये काम केलं; अन् आज अभिनेत्री कोट्याधीश
स्वतःच्या आनंदासाठी मी दुसऱ्या महिलेचे…; शबाना आझमी यांचा लग्नाबाबत खळबळजनक खुलासा
‘पुरुषांना मासिक पाळी आली असती तर…’, तिरस्काराने दुर्लक्ष करणाऱ्या पुरुषांवर जान्हवीने साधला निशाणा
तेच हसणं, तिच्यासारखेच हावभाव, तोच आवाज; तरुणीने केली प्राजक्ता माळीची हुबेहूब नक्कल, व्हिडीओ व्हायरल
‘भगवद्गीता’ आणि ‘नाट्यशास्त्रा’चा युनेस्कोच्या ‘जागतिक स्मृती रजिस्टर’मध्ये समावेश ; देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा