Sindhudurg News – पतीने मुंबईला नेलं नाही, पत्नीनं दोन चिमुकल्यांसह खाडीत मारली उडी

Sindhudurg News – पतीने मुंबईला नेलं नाही, पत्नीनं दोन चिमुकल्यांसह खाडीत मारली उडी

देवगड तालुक्यातील तिर्लोट-आंबेरी पुलावरून दोन लहान मुलांसह मातेने खाडीच्या पाण्यात उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. श्रीशा सुरज भाबल (24), श्रेयश (5) व दुर्वेश (4) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना 17 एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. पतीशी झालेल्या किरकोळ वादातून श्रीशाने मुलांसमवेत आत्महत्या केली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून या घटनेने देवगड तालुका हादरला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिर्लोट-आंबेरी येथील सुरज सुहास भाबल यांच्याशी श्रीशा हिचा 22 जून 2028 रोजी विवाह झाला. श्रीशाचे माहेर कर्नाटक रायचूर येथील असून ती आई वडिलांसमवेत कल्याण येथे राहत होती. तिचे पती सुरज भाबल हे नोकरीनिमित्त मुंबई दादर येथे राहत असून रेल्वेमध्ये नोकरीस आहेत. त्यांच्या लग्नाला सहा वर्षे झाली होती. श्रीशा ही तिचे मुलगे श्रेयश व दुर्वेश यांच्यासमवेत सासरी तिर्लोट आंबेरी येथे सासरे सुहास शिवराम भाबल, सासू सुहासिनी, दीर मिलींद यांच्यासमवेत राहत होती. 15 एप्रिल रोजी दुपारी 3 वा. च्या सुमारास श्रीशा हिने आपल्या पतीशी फोनवरून मुंबईला घेवून जाण्यासंदर्भात विचारणा केली. परंतू पती सुरज याने मुंबई येथे राहण्याची व्यवस्था नसल्याचे सांगत मुंबईला घेवून जाण्याबाबत नकार दिला. यावेळी रागाने श्रीशाने सासू व सासरे यांना न सांगता त्याच सायंकाळी 4.45 वा. दोन्ही लहान मुलांना घेवून घरातून निघून गेली आणि परत घरी आली नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली असता 16 एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 वा. च्या सुमारास आंबेरी जेटीजवळ श्रीशाचा मृतदेह आढळून आला. तसेच तेथीलच पिराचे पोय याठिकाणी श्रेयशचा मृतदेह सापडला. तर दुर्वेशचा मृतदेह 17 एप्रिल रोजी दुपारी आंबेरी खाडीपात्रातच कातळी किनारी सापडला.

घटनेची माहिती श्रीशाचे सासरे सुहास भाबल यांनी विजयदुर्ग पोलीस स्थानकात दिली. देवगड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. घटनेची माहिती समजताच पोलीस उपविभागीय अधिकारी घनःश्याम आढाव यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. यावेळी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, पोलीस उपनिरिक्षक दशरथ चव्हाण, पोलीस हवालदार प्रशांत जाधव, सुनिल पडेलकर, पो. कॉ. बाबाजी कांदे, प्रशांत गावडे, महिला पोलीस वनिता पडवळ यांनी घटनास्थळी पंचनामा केला. यावेळी तेथील रामकृष्ण जुवाटकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष कुलदीप लिंगायत, पोलीस पाटील अमित घाडी उपस्थित होते. विजयदुर्ग पोलीस स्थानकात या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाराष्ट्राला आणि मराठीला सर्वाधिक धोका हिंदीपासून नाही तर… संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट काय? महाराष्ट्राला आणि मराठीला सर्वाधिक धोका हिंदीपासून नाही तर… संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट काय?
महाराष्ट्र आणि मराठीला हिंदीपासून धोका नाही तर गुजरातीपासून धोका असल्याचा मोठा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी केला. संघाचे नेते भैय्याजी...
जैन मंदिरावरील कारवाईविरोधात मोठं आंदोलन, मागण्या काय?; मंगलप्रभात लोढा आणि अळवणीही रॅलीत
घटस्फोटानंतर लेकीकडे वळूनही…, पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप, अभिनेता म्हणाला…
वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेची मुलगी होती ‘ही’ अभिनेत्री, एका चुकीमुळे उद्ध्वस्त झालं आयुष्य
‘फुले’वरून ब्राह्मण समाजाबाबत वादग्रस्त विधान, अनुराग कश्यपनं मागितली जाहीर माफी; म्हणाला…
“आवडत्या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी वानखेडेबाहेर उभा राहायचो अन् आता…”, रोहित शर्मा भावूक
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्ताला सोने खरेदीचा फायदा होणार…वर्षभरात दिला जबरदस्त परतावा