सर्वसामान्यांचे प्रश्न ही फडणवीसांचे लेव्हल नाही, अदानी, अंबानीसाठी ते आहेत; संजय राऊत यांचा हल्लाबोल
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत वफ्फ बोर्ड, प्रफुल्ल पटेल, देवेद्र फडणवीस आणि भाजपवर हल्लाबोल केला. दाऊदशी संबंध असणारे प्रफुल्ल पटेल संसदेत महाराष्ट्राचे नेृतृत्व करत आहेत, हे दुर्दैव असल्याचेते म्हणाले. भाजपने वॉशिंग मशीनमध्ये त्यांना स्वच्छ केले आहे. मात्र, त्यांचा इतिहास काढला तर त्यांना देश सोडावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात महिलेच्या झालेल्या मृत्यूवरून भाजप आणि मुख्यमंत्री फडणवीस काय करत आहेत, असा सवालही त्यांनी केला.
पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेला प्रकार गंभीर आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांची पत्नीसाठी रुग्णालयात फोन केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, भिसे कुटुंबावर संकट ओढवले आहे. एका मातेचा करुण अंत झाला आहे. तर देवेंद्र फडणवीस सरकारला 100 दिवस झाले म्हणून भविष्याचा वेध घेत बसले आहेत. गोरगरिबांची, सर्वसामान्यांची कामे ही फडणवीस यांची नाहीत. त्यांची लेव्हल खूप वरची आहे. शेतकरी,सर्वसामान्य तडफडून मरत आहेत आणि योजना फक्त कागदावरच आहेत. मिंधे आणि अजित पवार फक्त पोपटपंची करत फिरत आहेत. अदानी, अंबानी, टाटा, बिर्ला यांची कामे ही फडणवीस यांची आहे. फडणवीस यांची ही लेव्हल आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी हाणला. मंत्रालयात बसून दम देणे सोपे आहे. मात्र, राज्यात अराजक आणि बजबजपुरी माजली आहे, याची फडणवीस यांना जाणीवही नाही. ते मोदींचे भजन करत आहेत. योदनांची स्वप्ने दाखवत आहे.
महाराष्ट्रात सर्वसामान्य माणासाकडे 20 लाख रुपये मागितले जातात. सर्वसामान्य माणसाकडे 20 लाख रुपये कसा असतील. हा अदानी, अंबानी यांचा महाराष्ट्र नाही. हा सर्वसामान्य आणि गोरगरिबांचा महाराष्ट्र आहे. आता फडणवीस यांच्यामध्ये हिंमत असेल तर रुग्णालयावर कारवाई करावी. भिसे कुटुंब ज्या डॉक्टरचे आणि संबिधतांचे नाव घेतात. त्यांच्यावर कारवाई करून दाखवावी. फक्त विरोधी पक्षांच्या नेत्यांवर कारवाई करण्यातच त्यांचे काम चालते. त्यांची लेव्हलच वेगळी असल्याने त्यांना राज्यात काय सुरू आहे, ते माहिती नाही. नागपूरात गोळीबार झाला, हे देखील त्यांना माहिती नाही, असेही ते म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List