शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, अजित पवार मुर्दाबाद…; परभणीत अजित पवारांच्या ताफ्यावर फेकल्या चुन्याच्या डब्या

शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, अजित पवार मुर्दाबाद…; परभणीत अजित पवारांच्या ताफ्यावर फेकल्या चुन्याच्या डब्या

कर्जमाफीची घोषणा करून सत्तेत आलेल्या महायुती सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. यामुळे राज्यातील महायुती सरकार विरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. परभणी दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना या रोषाचा सामाना करावा लागला. काँग्रेससह किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करत अजित पवार यांच्या वाहनांच्या ताफ्यासमोर चुन्याच्या डब्या फेकल्या.

“एक रुपया पीकविमा योजनेला शेतकऱ्यांनी लावला चुना” या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी परभणी जिल्हा कचेरीच्या प्रवेशद्वारावर अजित पवार यांच्या ताफ्यासमोर चुन्याच्या डब्या फेकल्या. अजित पवार मुर्दाबाद, शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे, अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. या आंदोलनामुळे पोलिसांची धावपळ उडाली.

शेतकऱ्यांमध्ये अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे संताप उसळला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी तसेच पीकविमा योजनेतील घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी किसान सभेने केली. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत काँग्रेस आणि किसान सभेचे काही पदाधिकारी ताब्यात घेतले. दरम्यान, अजित पवार यांचा ताफा कोणतीही अडचण न येता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजित बैठकीसाठी पुढे मार्गस्थ झाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

KKR VS PBKS – पावसामुळे कोलकाता आणि पंजाब यांच्यातील सामना रद्द, दोन्ही संघांना किती मिळाले पॉईंटस्? KKR VS PBKS – पावसामुळे कोलकाता आणि पंजाब यांच्यातील सामना रद्द, दोन्ही संघांना किती मिळाले पॉईंटस्?
कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील ईडन गार्डन्सवर सुरू असलेला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. पंजाबने कोलकातासमोर चार...
पहलगाम दहशतवादी हल्ल्याची करणार NIA चौकशी, केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आदेश
ही बॉलिवूड अभिनेत्री होती तिच्या शाळेतील शिक्षकाच्या प्रेमात; 39 व्या वर्षीही आहे सिंगल
Latur News – लातूर जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस, फळबागांचे नुकसान; शेतकऱ्यांना फटका
हिंदुस्थानने झेलम नदीमध्ये पाणी सोडले; पाकिस्तानात पूर, आणीबाणी लागू
पाकिस्तानी भैया, माझा मित्र! अतिरेक्यासोबत बंगाली तरुणाच्या फोटोने खळबळ
अनियंत्रित पिकअप वाहनाने 11 स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, 7 जणांचा मृत्यू; चौघे गंभीर