Jammu Kashmir – काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ल्याचा इशारा, गुप्तचर संस्थांकडून अलर्ट जारी

Jammu Kashmir – काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ल्याचा इशारा, गुप्तचर संस्थांकडून अलर्ट जारी

पहलगाम हल्ल्याची घटना ताजी असतानाच गुप्तचर संस्थांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये अलर्ट जारी केला आहे. काश्मीरमध्ये पुन्हा मोठा दहशतवादी हल्ला होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर लष्कर-ए-तैयबाच्या धोकादायक मॉड्यूलबद्दल सतर्क राहण्याचा इशारा गुप्तचर संस्थांनी दिला आहे. मिळालेल्या अलर्टनुसार, हे मॉड्यूल काश्मीरमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत आहे.

दहशतवादी टार्गेट किलिंगसह मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारी करत आहेत. दक्षिण काश्मीरमधील पर्यटन स्थळे हे या मॉड्यूलचे लक्ष्य आहे. दहशतवादी हल्ल्याचा धोका लक्षात घेता पर्यटन स्थळांची सुरक्षा वाढवण्यास आणि सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्यास सांगण्यात आले आहे. काश्मीरमध्ये हिंदुस्थानी लष्कर आणि सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी अनिवासी नागरिक, अल्पसंख्याक काश्मिरी पंडित आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना किंवा पायाभूत सुविधांना लक्ष्य करून भीषण हल्ले करण्याची योजना आखत आहेत.

दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील दोन प्रमुख रुग्णालयांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार राहण्याचे निर्देश दिले. शुक्रवारी सायंकाळी जम्मूच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाने (जीएमसी) अ‍ॅडवायजरी जारी करत कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.

तसेच स्टोअर अधिकाऱ्यांना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व आवश्यक साहित्य, आपत्कालीन औषधे आणि महत्त्वाची उपकरणे तयार ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांना अनावश्यक रजा न घेण्याचे आवाहनही अ‍ॅडवायजरीत करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

KKR VS PBKS – पावसामुळे कोलकाता आणि पंजाब यांच्यातील सामना रद्द, दोन्ही संघांना किती मिळाले पॉईंटस्? KKR VS PBKS – पावसामुळे कोलकाता आणि पंजाब यांच्यातील सामना रद्द, दोन्ही संघांना किती मिळाले पॉईंटस्?
कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील ईडन गार्डन्सवर सुरू असलेला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. पंजाबने कोलकातासमोर चार...
पहलगाम दहशतवादी हल्ल्याची करणार NIA चौकशी, केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आदेश
ही बॉलिवूड अभिनेत्री होती तिच्या शाळेतील शिक्षकाच्या प्रेमात; 39 व्या वर्षीही आहे सिंगल
Latur News – लातूर जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस, फळबागांचे नुकसान; शेतकऱ्यांना फटका
हिंदुस्थानने झेलम नदीमध्ये पाणी सोडले; पाकिस्तानात पूर, आणीबाणी लागू
पाकिस्तानी भैया, माझा मित्र! अतिरेक्यासोबत बंगाली तरुणाच्या फोटोने खळबळ
अनियंत्रित पिकअप वाहनाने 11 स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, 7 जणांचा मृत्यू; चौघे गंभीर