Air India – विमान लँड होताच पायलटला हृदयविकाराचा झटका, दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरील घटना
दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान लँड होताच एअर इंडियाच्या पायलटचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अरमान (28) असे मयत पायलटचे नाव असून नुकतेच त्याचे लग्न झाले होते. एअर इंडियाने एक निवेदन जारी करत अरमानच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला आहे.
श्रीनगर-दिल्ली विमानात ही दुर्दैवी घटना घडली. दिल्ली विमानतळावर लँड होताच अरमानला कॉकपीटमध्ये उलट्या झाल्या. त्यानंतर एअरलाईनच्या डिस्पॅच ऑफिसमध्ये त्याला हृदयविकाराचा झटका आला. अरमानला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर अरमानचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List