रेश्मा केवलरमानी जगातील सर्वात प्रभावी व्यक्तींच्या यादीत, हिंदुस्थानी वंशाची एकमेव महिला
जगातील सर्वात प्रभावी व्यक्तींच्या यादीत हिंदुस्थानी वंशाची एकमेव महिला रेश्मा केवलरमानी यांचा समावेश आहे. ‘टाइम’ मॅगझीनने 2025 मधील जगातील सर्वाधिक प्रभावी व्यक्तींची यादी जाहीर केली असून यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, इलॉन मस्क यांसह अनेकांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे या यादीत हिंदुस्थानातील एकाही व्यक्तीचा समावेश नाही, तर रेश्मा केवलरमानी या यादीत स्थान मिळवणाऱ्या हिंदुस्थानी वंशाच्या एकमेव महिला ठरल्या आहेत. त्यांचा जन्म मुंबईत झाला आहे.
अमेरिकेतील प्रतिष्ठत मासिक ‘टाइम’ दरवर्षी जगातील सर्वात प्रभावशाली 100 लोकांची यादी जाहीर करते. या मॅगझीनचे वाचक यासाठी मतदान करत असतात. यंदाच्या यादीत जगभरातील 32 देशांमधील 100 प्रभावी व्यक्तींचा समावेश आहे. ट्रम्प प्रशासनातील सहा व्यक्तींना या यादीत स्थान मिळाले आहे. 2009 नंतर प्रथमच असे घडले आहे. लीडर्स, टायटन्स आणि आयकॉन्स अशा तीन श्रेणींमध्ये टाइम मॅगझीनची यादी विभागण्यात आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सलग सातव्यांदा या यादीत स्थान मिळवले आहे. इलॉन मस्क यांनी सहा वेळा, मार्क झुकेरबर्ग 5 वेळा, सेरेना विल्यम्स, एड शिरन, ब्लेक लाइव्हली आणि स्कार्लेट जोहान्सन यांचे नाव प्रत्येकी तीन वेळा यादीत समाविष्ट झालंय.
11 व्या वर्षी अमेरिकेत स्थायिक
रेश्मा केवलरमानी या अमेरिकेतील बायोटेक्नॉलॉजी कंपनी ‘व्हर्टेक्स फार्मास्युटिकल्स’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. रेश्मा यांचा जन्म मुंबईत झाला असून वयाच्या 11 व्या वर्षी अमेरिकेत स्थायिक झाल्या. 1988 मध्ये त्यांनी बेस्टव विद्यापीठातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले, तर 2015 मध्ये त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून जनरल मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतली. रेश्मा अमेरिकेच्या ‘जिन्कगो बायोवर्क्स’ या बायोटेक कंपनीच्या संचालक मंडळावर आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List