वक्फवरील नेमणुका आणि मालमत्तांमध्ये हस्तक्षेप करू नका, कायद्यातील वादग्रस्त तरतुदींबाबत सात दिवसांत खुलासा करा; सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला आदेश

वक्फवरील नेमणुका आणि मालमत्तांमध्ये हस्तक्षेप करू नका, कायद्यातील वादग्रस्त तरतुदींबाबत सात दिवसांत खुलासा करा; सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला आदेश

अर्थसंकल्पीय अधिवेशनात वक्फ विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांत बहुमताच्या जोरावर केंद्र सरकारने मंजूर करून घेतले. मात्र अनेक राज्यांतून विरोध होत असतानाच सुधारित वक्फ कायद्यातील वादग्रस्त तरतुदींबाबत सात दिवसांत खुलासा करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र सरकारला दिले. तत्पूर्वी स्थगितीची नामुष्की टाळण्याकरिता वक्फ बोर्डावरील नेमणुका आणि मालमत्तांमध्ये हस्तक्षेप न करण्याची हमी केंद्र सरकारला न्यायालयात द्यावी लागली.

या कायद्याच्या संवैधानिक वैधतेला अनेक याचिकांतून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या तब्बल 150 हून याचिकांवर गुरुवारी सलग दुसऱया दिवशी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखाली न्यायमूर्ती पी. व्ही. संजयकुमार आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. तासभर झालेल्या सुनावणीवेळी खंडपीठाने सरकारला धारेवर धरत केंद्र सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

सुनावणीच्या सुरुवातीला याचिकाकर्त्यांनी वक्फ कायद्याला पूर्णपणे स्थगिती देण्याची विनंती केली. त्यावर न्यायालयाने पूर्ण स्थगिती देण्यास नकार दिला. मात्र सुधारित वक्फ कायद्यामुळे इतरांच्या हक्कांवर परिणाम होता कामा नये, असे स्पष्ट करत वादग्रस्त दोन कलमांवर स्थगिती आदेश देणार असल्याचे संकेत देत केंद्र सरकारला चांगलाच झटका दिला. इतकी कठोर भूमिका घेऊ नका, सरकारला किमान प्राथमिक उत्तर सादर करण्याची संधी द्या, असा युक्तिवाद सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केला. याचवेळी वादग्रस्त कलमांतील तरतुदींना अनुसरून वक्फ बोर्डावर तसेच केंद्रीय वक्फ परिषदेवर कोणतीही नेमणूक करणार नाही. त्याचबरोबर पुढील सुनावणीपर्यंत वक्फ बोर्डाच्या जागेच्या हक्कांबाबतही परिस्थिती जैसे थे ठेवली जाईल, अशी हमी मेहता यांनी सरकारतर्फे दिली.

वक्फ कायद्यावर आक्षेप घेणाऱया याचिकांमध्ये उपस्थित केलेल्या विविध मुद्दय़ांवर सात दिवसांत खुलासा करण्याचे आदेश केंद्राला दिले. तसेच पेंद्राच्या उत्तरानंतर याचिकाकर्ते पुढील पाच दिवसांत आपले प्रत्युत्तर दाखल करू शकतात, असेही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले. याप्रकरणी 5 मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन – अॅड. सिब्बल

सुधारित कायद्यामुळे मुस्लिमांच्या धर्मादाय संस्थांचे व्यवस्थापन करण्याच्या धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन होत आहे, असा जोरदार युक्तिवाद याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केला.

प्रातिनिधिक याचिकांवर सुनावणी

तब्बल 150 हून अधिक याचिकांशी संबंधित 110 ते 120 फाईल्स वाचणे शक्य नाही. सर्व याचिकांमधील पाच प्रातिनिधिक याचिकांवर सुनावणी घेण्यास न्यायालयाने सहमती दर्शवली. त्यानुसार पुढील सुनावणीला केवळ पाच याचिकाकर्ते न्यायालयात हजर राहतील.

न्यायालयाचे सक्त निर्देश

  • पुढील आदेशापर्यंत सरकारने सुधारित वक्फ कायद्यांतर्गत वक्फ बोर्डावर तसेच केंद्रीय वक्फ परिषदेवर कोणत्याही नवीन नेमणुका करू नयेत.
  • ‘वक्फ बाय युजर’ अधिसूचना वा वक्फ बोर्डाची जाहीर केलेली मालमत्ता रद्द करता येणार नाही.
  • जमिनीच्या हक्कांबाबत परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवा. जिल्हाधिकारीही यामध्ये कोणताही बदल करणार नाहीत, याची काटेकोर खबरदारी घ्या.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वक्फ बोर्डाच्या विधेयकास विरोध का केला? उद्धव ठाकरे यांनी सांगितले कारण वक्फ बोर्डाच्या विधेयकास विरोध का केला? उद्धव ठाकरे यांनी सांगितले कारण
संसदेत संमत झालेल्या वक्फ बोर्डाच्या विधेयकास शिवसेना उबाठाने विरोध केला होता. त्यानंतर शिवसेना उबाठावर टीका होऊ लागली होती. शिवसेना कामगार...
Jain Community Protest : जैन समाजाचा आजपर्यंत कधी आवाज ऐकला होता का? वर्षा गायकवाड यांचा सवाल
जेवण नव्हतं, 2oवर्ष फक्त 500 रुपयांवर हॉटेलमध्ये काम केलं; अन् आज अभिनेत्री कोट्याधीश
स्वतःच्या आनंदासाठी मी दुसऱ्या महिलेचे…; शबाना आझमी यांचा लग्नाबाबत खळबळजनक खुलासा
‘पुरुषांना मासिक पाळी आली असती तर…’, तिरस्काराने दुर्लक्ष करणाऱ्या पुरुषांवर जान्हवीने साधला निशाणा
तेच हसणं, तिच्यासारखेच हावभाव, तोच आवाज; तरुणीने केली प्राजक्ता माळीची हुबेहूब नक्कल, व्हिडीओ व्हायरल
‘भगवद्गीता’ आणि ‘नाट्यशास्त्रा’चा युनेस्कोच्या ‘जागतिक स्मृती रजिस्टर’मध्ये समावेश ; देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा