परळीत EVM सोबत छेडछाड, गप्प राहण्यासाठी दिले 10 लाख रुपये; बीडचे निलंबित PSI रणजीत कासलेंचा गौप्यस्फोट
परळीत ईव्हीएमसोबत छेडछाड करण्यात आली, मला बाजूला करण्यात आलं आणि नंतर अकाऊंटवर 10 लाख रुपये देण्यात आले, असा धक्कादायक गौप्यस्फोट बीडचे निलंबित पीएसआय रणजीत कासले यांनी केला आहे. गुरुवारी पुणे विमानतळावर रणजीत कासले हे आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना हा धक्कादायक गौप्यस्फोट केला. तसेच आपण बीड पोलिसांना शरण जाणार असल्याचं सांगितलं.
माजी मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव घेत रणजीत कासले म्हणाले की, “मी धनंजय मुंडे यांची कॅश पकडली होती. ईव्हीएमजवळ थांबायचं नाही, यासाठी माझ्या अकाउंटवर 10 लाख रुपये देण्यात आले. वाल्मीक कराड मला भेटले होते.” ते म्हणाले, “परळीजवळ राखेच्या सेंटरजवळ आमची भेट झाली होती. आमची मंगल कार्यालयात राहण्याची व्यवस्था केली होती. त्या ठिकाणी ते आले होते. मला शांत राहायला सांगण्यात आलं होतं. लोकसभेला बोगस मतदार करू दिलं नाही. यावेळी शांत राहा, असं मला सांगण्यात आलं होतं. बीडचे अॅडीशन एसपी जे चार वर्षांपासून आहेत, एकाच ठिकाणी ठाण मांडून आहेत ते वाल्मीक कराडचे हस्तक आहेत.”
कासले म्हणाले, “ईव्हीएम मशीनपासून तुम्ही दूर जायचे. ईव्हीएमध्ये काही छेडछाड होईल, ते गप्प बसायचं आणि सहन करायचं. परळीला जेव्हा मतदानावेळी अपुरं मनुष्यबळ होतं त्याचवेळी कासलेंची ईव्हीएमजवळची ड्युटी का काढली? यांना रेस्ट का दिला? यांचं त्या दिवशीचं लोकेशन काय आणि यांच्या अकाऊंटवर 10 लाख रुपये का जमा झाले? हे प्रश्न विचारल्यास सगळी उत्तरे मिळतील.”
परळीत EVM सोबत छेडछाड, गप्प राहण्यासाठी दिले 10 लाख रुपये; बीडचे निलंबित PSI रणजीत कासलेंचा गौप्यस्फोट pic.twitter.com/sMKBCQ5Xjo
— Saamana Online (@SaamanaOnline) April 17, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List