ग्रॅण्ड हयातमधील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद, भारतीय कामगार सेनेच्या वतीने आयोजन; हॉटेलमधील 250 कर्मचाऱ्यांनी घेतला सहभाग

ग्रॅण्ड हयातमधील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद, भारतीय कामगार सेनेच्या वतीने आयोजन; हॉटेलमधील 250 कर्मचाऱ्यांनी घेतला सहभाग

भारतीय कामगार सेनेच्या वतीने सांताक्रुझ येथील ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात हॉटेलमधील अडीचशे कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.

मुंबईतील वाढत्या रक्त तुटवडय़ाची गरज पाहता भारतीय कामगार सेनेच्या वतीने चिटणीस मनोज धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाही ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला शिवसेना नेते- खासदार संजय राऊत, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना नेते- खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई, शिवसेना सचिव विनायक राऊत, शिवसेना नेते, विभागप्रमुख-आमदार अॅड. अनिल परब, शिवसेना नेते-आमदार सुनील प्रभू, शिवसेना उपनेते -आमदार सचिन अहिर, आमदार संजय पोतनीस, वरुण सरदेसाई, सदा परब, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, भारतीय कामगार सेनेचे कार्याध्यक्ष अजित साळवी, व्यवस्थापनाकडून एचआर हेड राहुल सिंग, हॉटेल मॅनेजर सुमित दत्ता आदी उपस्थित होते. या शिबिराची तयारी युनिट कमिटीकडून प्रशांत नाईक, अभय प्रभू, सिद्धेश  पांढरकामे, संदेश परब, कुश गवस, संजय पातये, प्राजक्त तेली, हीना शेख, मेघना पंडीलवार, हिमांशू पावसकर यांनी केली.

z ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये दरवर्षी रक्तदान शिबीर, शेतकरी मदतनिधी असे समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. तसेच गुढीपाडवा, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी केली जाते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वक्फ बोर्डाच्या विधेयकास विरोध का केला? उद्धव ठाकरे यांनी सांगितले कारण वक्फ बोर्डाच्या विधेयकास विरोध का केला? उद्धव ठाकरे यांनी सांगितले कारण
संसदेत संमत झालेल्या वक्फ बोर्डाच्या विधेयकास शिवसेना उबाठाने विरोध केला होता. त्यानंतर शिवसेना उबाठावर टीका होऊ लागली होती. शिवसेना कामगार...
Jain Community Protest : जैन समाजाचा आजपर्यंत कधी आवाज ऐकला होता का? वर्षा गायकवाड यांचा सवाल
जेवण नव्हतं, 2oवर्ष फक्त 500 रुपयांवर हॉटेलमध्ये काम केलं; अन् आज अभिनेत्री कोट्याधीश
स्वतःच्या आनंदासाठी मी दुसऱ्या महिलेचे…; शबाना आझमी यांचा लग्नाबाबत खळबळजनक खुलासा
‘पुरुषांना मासिक पाळी आली असती तर…’, तिरस्काराने दुर्लक्ष करणाऱ्या पुरुषांवर जान्हवीने साधला निशाणा
तेच हसणं, तिच्यासारखेच हावभाव, तोच आवाज; तरुणीने केली प्राजक्ता माळीची हुबेहूब नक्कल, व्हिडीओ व्हायरल
‘भगवद्गीता’ आणि ‘नाट्यशास्त्रा’चा युनेस्कोच्या ‘जागतिक स्मृती रजिस्टर’मध्ये समावेश ; देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा