Bride Grooming Tips- तुमचंही लग्न ठरलंय का? लग्नाआधी फक्त 10 दिवस ही गोष्ट करा, नवरी इतकी सुंदर दिसेल की नजर हटणार नाही!

Bride Grooming Tips- तुमचंही लग्न ठरलंय का? लग्नाआधी फक्त 10 दिवस ही गोष्ट करा, नवरी इतकी सुंदर दिसेल की नजर हटणार नाही!

लग्नाचा सीझन सुरु झाल्यानंतर, सर्वात महत्त्वाची तयारी सुरु होते ती शाॅपिंगची. पण या शाॅपिंगच्या जोडीला मेकअप आणि लग्नातील एकूण लूक कसा असेल यासाठी आटापिटा सुरु होतो. लग्नात तुमचा आऊटफिट तर सुंदर असायलाच हवा, पण याहीबरोबरीने आपला चेहराही सुंदर ठेवणे खूप गरजेचे आहे. लाखो रुपयांचे कपडे अंगावर आहेत, पण तुमचा चेहरा निस्तेज दिसत असेल तर, तुमचा लूक पूर्णपणे फिका पडेल. म्हणूनच लग्नाआधी केवळ काही दिवस काळजी घेतल्यास, लग्नाच्या दिवशी वधूच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसून येते.

लग्नाच्या दिवशी सर्वांच्या नजरा वधूचा लूक पाहण्यासाठी उत्सुक असतात. प्रत्येकाला फक्त वधूची एक झलक पहायची असते. म्हणूनच वधूला उन्हाळ्यात त्वचेची अधिक काळजी घ्यावी लागते. घाम आणि उष्णतेमुळे, मेकअप खराब झाल्यास चेहरा काळपट दिसण्याची शक्यता अधिक असते. वधूच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक पाहायची असेल, तर हे घरगुती नाईट क्रीम लावून बघा, अवघ्या 10 दिवसांमध्ये तुमचा चेहरा खुलून येईल.

घरी नाईट क्रीम कशी बनवायची?

साहित्य
चंदन तेल – 2 टेबलस्पून
पपई जेल – 2 टेबलस्पून
टी ट्री तेल – 2 टेबलस्पून
रोझमेरी तेल – 2 टेबलस्पून
गुलाबजल – 2 टेबलस्पून

कृती- ही क्रीम बनवण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यात चंदनाचे तेल आणि टी ट्री आॅइल घ्यावे लागेल आणि ते हलके गरम करावे लागेल. यानंतर त्यात पपई जेल आणि रोझमेरी तेल मिसळावे. हे सर्व पदार्थ चांगले मिसळा आणि गॅस बंद करा. थंड झाल्यावर त्यात गुलाबजल घाला आणि चांगले मिसळा. अशापद्धतीने घरगुती नाईट क्रीम तयार होईल.

ही क्रीम छोट्या काचेच्या भांड्यात भरुन ठेवा. लग्नाआधी किमान दहा दिवस ही क्रीम रोज रात्री झोपताना चेहऱ्यावर लावावी. यामुळे चेहऱ्यावर ग्लो यायला सुरुवात होईल.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वक्फ बोर्डाच्या विधेयकास विरोध का केला? उद्धव ठाकरे यांनी सांगितले कारण वक्फ बोर्डाच्या विधेयकास विरोध का केला? उद्धव ठाकरे यांनी सांगितले कारण
संसदेत संमत झालेल्या वक्फ बोर्डाच्या विधेयकास शिवसेना उबाठाने विरोध केला होता. त्यानंतर शिवसेना उबाठावर टीका होऊ लागली होती. शिवसेना कामगार...
Jain Community Protest : जैन समाजाचा आजपर्यंत कधी आवाज ऐकला होता का? वर्षा गायकवाड यांचा सवाल
जेवण नव्हतं, 2oवर्ष फक्त 500 रुपयांवर हॉटेलमध्ये काम केलं; अन् आज अभिनेत्री कोट्याधीश
स्वतःच्या आनंदासाठी मी दुसऱ्या महिलेचे…; शबाना आझमी यांचा लग्नाबाबत खळबळजनक खुलासा
‘पुरुषांना मासिक पाळी आली असती तर…’, तिरस्काराने दुर्लक्ष करणाऱ्या पुरुषांवर जान्हवीने साधला निशाणा
तेच हसणं, तिच्यासारखेच हावभाव, तोच आवाज; तरुणीने केली प्राजक्ता माळीची हुबेहूब नक्कल, व्हिडीओ व्हायरल
‘भगवद्गीता’ आणि ‘नाट्यशास्त्रा’चा युनेस्कोच्या ‘जागतिक स्मृती रजिस्टर’मध्ये समावेश ; देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा