दिल्लीत आठ अवैध बांगलादेशी ताब्यात
बेकायदेशीरपणे राहणाऱ्या आठ अवैध बांगलादेशी नागरिकांना राजधानी दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. दक्षिण-पश्चिम दिल्लीतून मानवी तस्करी प्रकरणात सहभागी असलेल्या 38 वर्षीय व्यक्तीसह आठ जणांना ताब्यात घेण्यात आले. रबिउल इस्लाम (38), त्याची पत्नी सीमा (27), मुलगा अब्राहम (5), पापिया खातून (36), सादिया सुलताना (21), सुहासिनी (1), आर्यन (7) आणि रिफत आरा मोयना (28) अशी त्यांची नावे आहेत. दलालांच्या मदतीने त्यांनी 2007 ते 2023 दरम्यान अवैधरित्या हिंदुस्थानात प्रवेश केला होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List