अतिउत्तम ! आता ED आणि ACB आता गुंडाळून टाका , अंजली दमानिया यांचा अमित शहांना टोला
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते रायगड किल्ल्यावर जाणार आहेत व त्यानंतर अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांच्या घरी भोजणासाठी जाणार आहेत. त्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे.
”कितीही मोठा घोटाळा करा, काही प्रॉब्लम नाही. 72 हजार कोटींचा सिंचन घोटाळा आठवतो का ? त्याचे पुढे काय झाले ? काहीच नाही ना ? कारण आपलं थर्ड क्लास राजकारण. घोटाळ्याची चौकशी कधीच करायची नव्हती. फक्त धमकी देऊन, महाराष्ट्रात सत्ता आणायची होती. आता त्याच तटकरेंच्या घरी गृहमंत्री जेवायला जाणार? अतिउत्तम ! ED आणि ACB आता गुंडाळून टाका” अशी संतप्त प्रतिक्रीया दमानिया यांनी दिली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List