Lime Peels- लिंबाच्या साली फेकून देण्याची चूक तुम्हीपण करताय का? आजपासून हे करणं थांबवा

Lime Peels- लिंबाच्या साली फेकून देण्याची चूक तुम्हीपण करताय का? आजपासून हे करणं थांबवा

उन्हाळा आला की, घरात हमखास लिंबाचा सरबत केला जातो. लिंबाचा वापर हा प्रामुख्याने उन्हाळ्यात खूप वेळा केला जातो. लिंबाचा रस काढून झाल्यावर, लिंबाची साल आपण लगेच कचऱ्यात फेकून देतो. परंतु लिंबाच्या रसासोबतच लिंबाच्या सालीचा वापर घरातील वस्तू स्वच्छ करण्यासाठी, इलेक्ट्रॉनिक वस्तूंना दुर्गंधीमुक्त करण्यासाठी, भांडी चमकवण्यासाठी आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. उन्हाळ्यात लिंबाचा रस त्वचा, शरीर आणि केसांसाठी फायदेशीर असतो. याशिवाय, घरातील वस्तूंमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी सुद्धा केला जातो. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि इतर अनेक गुणधर्म असतात, यामुळे हे घटक खूप फायदेशीर असतात. अनेकदा लिंबाची साल रस काढल्यानंतर फेकून दिली जाते पण तुम्हाला माहिती आहे का, आपण त्याचा परत उपयोग करु शकतो.

लिंबाच्या सालीचे उपयोग

लिंबाची साल बारीक करुन साखरेत मिसळून घ्यावी. हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर किंवा शरीरावरील काळपट भागांवर लावल्यास, हलक्या हातांनी स्क्रब करावे.

लिंबू आणि त्याची साल दोन्ही आम्लयुक्त असतात. त्यामुळे जुने डाग, ग्रीस गंज काढून टाकण्यासाठी उपयोगी पडतात. लिंबाच्या साली या आपण डिशवाॅशसोबत वापरू शकतो.

मायक्रोवेव्हमध्ये कुबट वास येत असल्यास, तो दूर करण्यासाठी लिंबाच्या सालींचा वापर करता येतो. याकरता एका मायक्रोवेव्ह सेफ बाऊलमध्ये थोडे पाणी घ्या आणि त्यात उरलेले लिंबाची साले टाकावी. हे पाणी उकळू लागल्यानंतर त्याची वाफ होईल. ती वाफ नंतर पुसून काढल्यानंतर मायक्रोवेव्हमध्ये येणारा कुबट वास हा निघून जाईल.

लिंबाच्या सालीत बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात. यामुळे रेफ्रिजरेटरमधील दुर्गंधी कमी होण्यास मदत होते. सर्वप्रथम फ्रिज रिकामा करुन त्यात, ६-७ लिंबाच्या साली पाण्यात टाका आणि काही वेळ तसेच ठेवावे. त्याच पाण्याने फ्रिज स्वच्छ करा. हे असे केल्याने फ्रिजमधील दुर्गंधी दूर तर होईलच, शिवाय अन्न दीर्घकाळ ताजेही राहील.

लिंबाच्या सालीपासून तेलही तयार करता येते. हे तेल केस आणि त्वचेसाठी दोन्हीसाठी वापरले जाऊ शकते. व्हिटॅमिन सी मुळे चमक येते आणि तेलकटपणामुळे त्वचा मऊ होते. एवढेच नाही तर हे लिंबाच्या सालीचे तेल केसांमधील कोंडा दूर करते आणि जेवणात देखील वापरले जाऊ शकते. हे तेल चव आणि सुगंधासाठी सॅलड, मॅरीनेड आणि ड्रेसिंगमध्ये वापरले जाऊ शकते.

तेलकट त्वचा असलेल्यांसाठी लिंबाच्या सालीचा फेस पॅक खूप फायदेशीर आहे. यासाठी लिंबाच्या सालीची पावडर, बेसन आणि गुलाबपाणी मिसळून पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचेवरील अतिरिक्त तेल निघून जाते आणि मुरुम आणि डाग कमी होतात.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रविवारची कामं आजच करा, एक दोन नव्हे 5 तासांचा मेगाब्लॉक; चेक करा पटापट रविवारची कामं आजच करा, एक दोन नव्हे 5 तासांचा मेगाब्लॉक; चेक करा पटापट
मुंबईकरांची लाइफलाइन नावाने ओळखल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेवर रोजच तूफान गर्दी असते. सोमवार ते शनिवार गर्दीची, ऑफीसची वेळ तर रविवारी बरेच...
MNS : हिंदीच्या सक्तीविरोधात मनसेनं ठरवलं, आर-पार, ‘टोकाला जाईपर्यंत संघर्ष’,
सनी देओल विरोधार FIR दाखल, प्रसिद्ध अभिनेत्याचं देखील नाव सामिल
‘किती जुनं नाव..’; मुलाच्या नावावरून झहीर खान-सागरिका घाटगे ट्रोल
वडिलांकडूनच वाईट कृत्य, सर्वांसमोर मारझोड, त्याच अभिनेत्रीचा आज राजकारणातही बोलबाला
Crime news – विवाहित मेहुणीवर दाजीने केला बलात्कार
तुमच्याही किचनमध्ये आहे का ‘ब्रेस्ट कॅन्सर’चा धोका निर्माण करणारे हे तेल! संशोधनात खळबळजनक खुलासा