‘देवमाणसाची सटकली की काय?’, अजय देवगणने चक्क शेअर केला मराठी सिनेमाचा ट्रेलर, तुम्ही पाहिलात का?

‘देवमाणसाची सटकली की काय?’, अजय देवगणने चक्क शेअर केला मराठी सिनेमाचा ट्रेलर, तुम्ही पाहिलात का?

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तेजस देऊस्कर दिग्दर्शित ‘देवमाणूस’ चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मराठी सिनेसृष्टीतूनही या ट्रेलरवर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच बॉलिवूडचा ‘सिंघम’ अजय देवगणलाही या ट्रेलरने भुरळ घातली आहे. त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या सिनेमाचा ट्रेलर शेअर केला आहे. तुम्ही ट्रेलर पाहिली आहे का?

अजय देवगणने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘देवमाणूस’ चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. हा ट्रेलर शेअर करत त्याने निर्माते लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या मराठीतील पदार्पणाबद्दल अभिनंदन करत, ट्रेलर खूपच उत्कंठावर्धक आहे, देवमाणसाची सटकली की काय होते…? असे म्हणत संपूर्ण टीमला चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर राजकुमार राव, अर्जुन कपूर, सनी सिंग यानेही या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत.

वाचा: “मी स्वतःला ‘महागुरू’ समजतच नाही”, ट्रोलर्सला सचिन पिळगावकरांनी दिले उत्तर

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

काय आहे चित्रपटाचा ट्रेलर?

ट्रेलरमध्ये ‘देवमाणूस’च्या रहस्यपूर्ण, गूढ आणि भावनिक कथानकाची झलक पाहायला मिळते. ट्रेलरमधील रेणुका शहाणे आणि महेश मांजरेकर यांची जोडी संपूर्ण गावाला आवडत असते. सर्वजण महेश मांजरेकर यांना ‘देवमाणूस’ बोलतात. पण काही गुंड त्यांच्या मागे लागले आहेत. आता नेमकं काय झालं आहे हे सिनेमा पाहिल्यावरच कळेल. दमदार अभिनय, दाट भावनांचा प्रवाह आणि उत्कंठा वाढवणारे प्रसंग यामुळे हा चित्रपट एक संस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे. ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली असून ‘देवमाणूस’ मराठी प्रेक्षकांमध्ये जागतिक स्तरावर आपली छाप सोडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

कधी प्रदर्शित होणार सिनेमा?

लव फिल्म्स प्रस्तुत ‘देवमाणूस’ या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊस्कर यांनी केले असून, लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी निर्मिती केली आहे. महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे, सिद्धार्थ बोडके यांच्या भूमिका असणारा हा चित्रपट येत्या 25 एप्रिल 2025 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Sanjay Nirupam :  ‘हिंदीमध्ये काहीही चूक नाही, महाराष्ट्रातील सर्व मुलांना….’ संजय निरुपम मराठी vs हिंदी वादात काय म्हणाले? Sanjay Nirupam : ‘हिंदीमध्ये काहीही चूक नाही, महाराष्ट्रातील सर्व मुलांना….’ संजय निरुपम मराठी vs हिंदी वादात काय म्हणाले?
“तुम्ही तुमच्या मंदिराच्या ट्रस्टमध्ये बिगर हिंदूला सदस्य बनवणार का? हा सुप्रीम कोर्टाचा प्रश्नच एकदम चुकीचा आहे. कारण असं आहे की,...
हे तर पडद्यामागचे राजकारण…हिंदीच्या सक्तीवरून संजय राऊत यांनी धु धु धुतले; कशासाठी घेतला निर्णय, दिले हे कारण
‘भारतात जातीवाद आहे की नाही? एकदाच काय ते ठरवा’; अनुराग कश्यप का भडकला?
3 दिवस कुजत राहिला काजोलच्या आजीचा मृतदेह, वयाच्या 84 व्या वर्षी हृदयद्रावक अंत
इतर महिलांकडे पाहिल्यावर आकर्षित होता का? लक्ष्मीकांत बेर्डे यांचं प्रामाणिक उत्तर
सूडबुद्धीने निलंबित केलेल्या शिक्षक गिरीश फोंडेंवरील कारवाई मागे घ्या, कोल्हापूर महापालिकेवर शिक्षकांचा मोर्चा मूक मोर्चा
महाराष्ट्राचा आत्मा, भाषा, संस्कार मराठीच! ही आमची राजभाषा, इथे मराठीच चालणार; संजय राऊत यांनी ठणकावले