मुस्लिमांच्या धर्मात हस्तक्षेप आहे का? वक्फच्या प्रश्नावर कंगना राणौत यांचं स्पष्ट वक्तव्य

मुस्लिमांच्या धर्मात हस्तक्षेप आहे का? वक्फच्या प्रश्नावर  कंगना राणौत यांचं स्पष्ट वक्तव्य

Kangana Ranaut on Waqf Amendment Bill: वक्फ संशोधन विधेयकामुळे मोदी सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आहे. मुस्लिम समाजातील एक वर्ग या विधेयकाच्या विरोधात आहे. अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत यांनी वादग्रस्त विधेयकावर प्रतिक्रिया दिली आहे. गुरूवार, 3 एप्रिल रोजी संसद भवन संकुलात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, भ्रष्टाचार संपुष्टात येत आहे. कोणतीही व्यक्ती किंवा संस्था कायदा आणि संविधानापेक्षा मोठा नाही.

हिमाचाल प्रदेशातील मंडी मतदारसंघाच्या खासदार कंगना राणौत वक्फ संशोधन विधेयकाचं कौतुक करत म्हणाल्या, ‘कोणतीही व्यक्ती किंवा संस्था कायदा आणि संविधानापेक्षा मोठा नाही. देशातील वक्फ मालमत्तेचे व्यवस्थापन आणि प्रशासन सुधारणे हा या विधेयकाचा उद्देश आहे. हा ऐतिहासिक दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच पाहायला मिळाला आहे. देशाच्या कायद्याशिवाय दुसरं काहीही मोठं नाही. स्वच्छता आंदोलन, भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन, अस्वच्छतेच्या विरोधात, ही सर्व कामे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे पूर्ण झाली आहेत. वक्फ बोर्डाने ताब्यात घेतलेली जमीन अनेक देशांच्या क्षेत्रफळापेक्षा जास्त आहे.’

विरोधकांना सडेतोड उत्तर

विरोधकांवर निशाणा साधत कंगना म्हणाल्या, ‘‘नियामक संस्था, डीसी, जिल्हा दंडाधिकारी देखरेख करतील. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कोणतंही बेकायदेशीर काम केलं तर कायदेशीर यंत्रणा त्यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करू शकते. या आधी देशाची काय स्थिती होती ते पहा. वर्षानुवर्षे रखडलेली सर्व कामे पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत.’

विधेयक मुस्लिमांच्या विरोधात आहे का? यावर कंगना म्हणाल्या, ‘गृहमंत्री अमित शाह आणि मंत्री किरेन रिजिजू यांनी विधेयक स्पष्टपणे समजून सांगितलं आहे. त्यामुळे मला नाही वाटत की आखणी विस्ताराने सांगण्याची गरज नाही. कोणतीही व्यक्ती, कोणतीही संस्था, कोणतीही धार्मिक संघटना कायद्याच्या किंवा संविधानाच्या वर नाही. या देशाच्या संविधानाच्या वर कोणीही नाही… असं देखील कंगना राणौत म्हणाल्या आहेत.

कंगना राणौत यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्या कायम त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. ज्यामुळे कंगना यांना वादग्रस्त परिस्थितीचा देखील सामना करावा लागला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘देवमाणसाची सटकली की काय?’, अजय देवगणने चक्क शेअर केला मराठी सिनेमाचा ट्रेलर, तुम्ही पाहिलात का? ‘देवमाणसाची सटकली की काय?’, अजय देवगणने चक्क शेअर केला मराठी सिनेमाचा ट्रेलर, तुम्ही पाहिलात का?
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तेजस देऊस्कर दिग्दर्शित ‘देवमाणूस’ चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मराठी सिनेसृष्टीतूनही या ट्रेलरवर कौतुकाचा वर्षाव...
केमिकल्सना रामराम! घरच्या घरी अशी तयार करा नैसर्गिक सनस्क्रीन
राणीच्या बागेत येणाऱ्या पर्यटकांची संख्या घटली, उत्पन्नावर परिणाम
हिंदुस्थानच्या माजी सरन्यायाधीशांनी निकालाचे 221 पॅराग्राफ कॉपी पेस्ट केले! सिंगापूरच्या सर्वोच्च न्यायालयाचे दीपक मिश्रांवर गंभीर आरोप
US-China-Trade-War- ट्रम्प यांचा घाव चीनच्या वर्मी; युआन 18 वर्षांच्या निचांकी पातळीवर
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 11 एप्रिल 2025, वृषभ राशींच्या पालकांना घ्यावी लागणार दक्षता
मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला हिंदुस्थानात आणले; NIA घेणार ताबा