इंटिमेट सीन करताना अभिनेत्याने ओलांडल्या सर्व मर्यादा; केलं हे घाणेरडे कृत्य, अभिनेत्रीचा खुलासा
चित्रपट असोत किंवा मालिका, त्यापैकी बहुतेकांमध्ये इंटिमेट सीन्स हे असतातच. पण बऱ्याचदा अनेकवेळा असे सीन्स करताना अभिनेते आणि अभिनेत्रींना अनेक विचित्र अनुभव येतात. अनेकदा सेलिब्रिटींनी ते बोलूनही दाखवलं आहे. असाच एक अनुभव एका अभिनेत्रीने सांगितला आहे. इंटिमेट सीनदरम्यान तिला आलेला एक विचित्र अनुभव या अभिनेत्रीने सांगितला आहे. शूटिंगच्या बहाण्याने अभिनेत्याने तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचं तिने म्हटलं आहे.
सीन करतेवेळी अभिनेता एक्साइटेड
ही बॉलिवूड अभिनेत्री आहे अनुप्रिया गोएंका. हिने नुकतीच तिच्यासोबत घडलेल्या एका विचित्र घटनेबद्दल सांगितलं आहे. अनुप्रिया गोएकाला एका दृश्यादरम्यान तिच्या एका सहकलाकाराने सीन करतेवेळी एक्साइटमेंटमध्ये तिला अनकंफर्टेबल केलं होतं. त्याच्या कृत्यामुळे अभिनेत्रीला खूप वाईट अनुभव आला होता.
किसींग सीनदरम्यान घडली घटना
आताच्या झालेल्या एका मुलाखतीत अनुप्रियाने म्हटलं की, ‘हा असा प्रकार दोनदा घडला आहे. एकदा तर मी असे म्हणणार नाही की तो माणूस माझा फायदा घेत होता. पण त्याने एक्साइटमेंटमध्ये त्याने हे कृत्य केलं. मला दिसत होतं की तो उत्साहित होत होता, जे व्हायला नको होतं.मग अशावेळी तुम्हाला नक्कीच थोडे अपमानित आणि अस्वस्थ वाटतं. हे सर्व किसींग सीनदरम्यान घडलं होतं.
“मी असे कपडे घातले होते जे आरामदायी नव्हते”
अनुप्रियाने आणखी एक घटना सांगितली आणि म्हणाली, ‘एका सीनदरम्यान मी असे कपडे घातले होते जे आरामदायी नव्हते. मला आशा होती की सह-अभिनेता, एक पुरूष असल्याने, हे तो जाणून घेईल की अशा दृश्यांमध्ये स्त्रीला कंबरेला धरणं सोपे आहे. पण त्याने जवळजवळ माझ्या नितंबावर हात ठेवला, जे फारच धक्कादायक होतं. तो माझ्या कमरेवर हात ठेवू शकला असता” असं म्हणत तिने दुसरा एक प्रसंग सांगितला.
“त्याला मी कंबरेला धरायला सांगितले”
अनुप्रियाने पुढे म्हणाली, ‘नंतर, मी त्याचे हात थोडे वर (कंबरेपर्यंत) घेतले आणि त्याला खाली नाही तर कंबरेला धरायला सांगितले. पण त्या क्षणी मी त्याला विचारू शकले नाही की त्याने असं का केलं.कारण तेव्हा तो म्हणाला असता की ते चूकन झालं होतं” . पुढे ती म्हणाली की, “मी त्यावेळी त्याला सांगू शकले नाही. पण पुढच्या वेळी मी त्याला सांगितलं,की हे करू नको. मग त्याने त्यावर कृती केली”. अशापद्धतीने तिने तिच्यासोबत घडलेले हे किस्से सांगितले.
अनुप्रियाने सलमान खान आणि हृतिक रोशनच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती ‘टायगर जिंदा है’, ‘वॉर’, ‘बॉबी जासूस’ आणि ‘पद्मावत’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List