कुमार संगकारासोबत मलायकाच्या डेटिंगच्या चर्चा; अभिनेत्री म्हणाली “याआधी मी अशी..”
चेन्नई सुपरकिंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील आयपीएल सामनादरम्यान अभिनेत्री मलायका अरोराची जोरदार चर्चा झाली. यावेळी मलायका राजस्थान रॉयल्स टीमची जर्सी घालून त्यांच्यासाठी चीअर्स करताना दिसली. त्याहीपेक्षा मलायका हा सामना पाहण्यासाठी ज्या व्यक्तीच्या बाजूला बसली होती, त्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं होतं. श्रीलंकेचा माजी क्रिकेटर कुमार संगकारा मलायकाच्या बाजूला बसला होता. या दोघांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. तेव्हापासून त्यांच्या डेटिंगच्या चर्चांनाही उधाण आलं आहे. त्यावर आता खुद्द मलायकाने मौन सोडल्याचं समजतंय.
अभिनेता अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा प्रेमात पडण्याविषयी मलायका नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाली, “मी सध्या त्यावर माझं लक्ष केंद्रीत करत नाहीये. या अशा गोष्टी आहेत, ज्यांची प्लॅनिंग केली जाऊ शकत नाही. मी फक्त माझ्यातल्या संयमासाठी कृतज्ञ आहे, ज्यामुळे माझं डोकं खूप शांत आहे. याआधी मी अशी नव्हते. पण आता मी खूप शांत आणि आनंदी आहे. पुढे काय होईल, यावर माझं नियंत्रण नाही. जर एखादी गोष्ट व्हायची असेल तर तरी होतेच. प्रेमाबद्दल बोलायचं झाल्यास, माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत मी प्रेमावर विश्वास ठेवीन. प्रेमामुळे मला दिशा मिळते आणि माझ्या आयुष्यात नेहमीच प्रेमासाठी जागा राहील.”
Malaika Arora with Kumar Sangakkara.#kumarsangakkara #MalaikaArora #RRvsCSK pic.twitter.com/0apGcNexvr
— Sonu Agarwall
(@SonuKum00171039) March 30, 2025
गेल्या सहा वर्षांपासून मलायका ही अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत होती. गेल्या वर्षी या दोघांचं ब्रेकअप झालं. गेल्या वर्षी दिवाळीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात खुद्द अर्जुनने सिंगल असल्याचं सर्वांसमोर जाहीर केलं होतं. अर्जुनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मलायकाचं नाव फॅशन स्टायलिस्ट राहुल विजयशी जोडलं गेलं होतं. परंतु या चर्चांवर दोघांनी कधीच प्रतिक्रिया दिली नाही. मलायका लग्नाच्या 19 वर्षांनंतर अरबाज खानपासून विभक्त झाली. 2017 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला. या दोघांना अरहान खान हा मुलगा आहे. घटस्फोटानंतरही सुखदु:खाच्या काळात अरबाज आणि मलायका एकमेकांसोबत दिसून येतात. मलायकाने तिच्या मुलासोबत मिळून हॉटेलचा व्यवसाय सुरू केला आहे. या हॉटेलमध्ये अरबाज आणि त्याचे कुटुंबीय पोहोचले होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List