सीनदरम्यान कपडे घसरले; दिग्दर्शकाने चित्रपटात दाखवला न्यूड सीन; अभिनेत्रीने आयुष्यच संपवलं

सीनदरम्यान कपडे घसरले; दिग्दर्शकाने चित्रपटात दाखवला न्यूड सीन; अभिनेत्रीने आयुष्यच संपवलं

आजकाल मराठी चित्रपट असो किंवा बॉलिवूड इंटीमेट सीन्स, बोल्ड सीन ही अगदी सामान्य गोष्टच झाली आहे. मात्र जुन्या काळातील चित्रपटांमध्ये असे सीन फारच कमी व्हायचे. किंवा आताच्या पद्धतीने ते थेट शूट केले जात नसतं. त्यावेळी असे इंटीमेट सीन्स, बोल्ड सीन थेट देण्यासाठी कोणताही अभिनेता किंवा अभिनेत्री शक्यतो तयार होत नसतं. त्यामुळे चित्रपटांमध्ये असे सीन खूपच कमी असायचे. मात्र एका अभिनेत्रीचा तिच्या नकळत न्यूड सीन घेण्यात आला होता. आणि तो चित्रपटात दाखवण्यातही आला होता. पण त्यानंतर त्या अभिनेत्रीने जे केलं ते धक्कादायक होतं.

चित्रपटाच्या रिलीजनंतर स्वत:चं आयुष्यच संपवलं होतं

ही अभिनेत्री आहे, विजयश्री. साऊथ अभिनेत्री विजयश्रीने हा सीन दाखवण्यात आलेल्या या सीनमुळे चित्रपटाच्या रिलीजनंतर स्वत:चं आयुष्यच संपवलं होतं. अवघ्या 21 व्या वर्षी तिने आत्महत्या केली. विजयश्री ही एक अत्यंत सुंदर, हुशार आणि मेहनती अभिनेत्री होती. लोकं तिला “दक्षिणेची मर्लिन मनरो” असंही म्हणायचे. 1953 साली जन्मलेल्या विजयश्रीने वयाच्या 13 व्या वर्षी ‘चिठी’ या तमिळ चित्रपटातून तिच्या करिअरला सुरुवात केली. तिच्या अभिनयात एक निरागसता होती, जी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायची.

सीनदरम्यान तिचे कपडे थोडे घसरले अन्….

1973 साली ती ‘पोन्नापोरम कोट्टा’ या चित्रपटात ती काम करत होती. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान तिचा एक धबधब्याखाली आंघोळ करतानाचा सीन होता. त्याचपद्धतीचे तिने त्यात कपडे परिधान केलेलेही दाखवण्यात आलं आहे. पण या सीनदरम्यान तिचे कपडे थोडे घसरले आणि त्या क्षणी उपस्थित कॅमेरामनने शूटिंग थांबवण्याऐवजी रेकॉर्डिंग सुरूच ठेवलं. आणि हा सीन शूट केला. पण हा सीन शूट होतोय किंवा केला गेलाय याची विजयश्रीला काहीही कल्पना नव्हती.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एका वर्षानंतर आत्महत्या केली

जेव्हा हा चित्रपट जेव्हा रिलीज झाला तेव्हा विजयश्रीच्या लक्षात आलं की तिचा तो न्यूड सीन तिच्या परवानगीशिवाय आणि मुख्य म्हणजे तिला कोणतीही कल्पना न देता ठेवण्यात आला होता. तिने दिग्दर्शक आणि निर्मात्यांना तो सीन काढून टाकण्याची विनंतीही केली होती. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचं म्हटलं जातं.कारण लोकांना हा चित्रपट खूप आवडला. विशेषतः त्या दृश्यावर लोकांनी खूप टाळ्या वाजवल्या. मात्र ती खूपच विजयश्री फारच अस्वस्थ झाली. या सीनमुळे ती फारच घाबरली होती. आणि तिला मोठा धक्काही बसला होता. पण अभिनेत्रीला इतकी लाज वाटली की तिने चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एका वर्षानंतर आत्महत्या केली

तथापि, विजयश्रीच्या मृतदेहाजवळ कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. पण रिपोर्ट्सनुसार, कॅमेरामन विजयाश्रीला ब्लॅकमेल करत होता आणि ती याबद्दल खूप नाराज होती. या समस्येला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे.

 

 

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘हे आमचे भावोजी का?.. ऑलमोस्ट हार्ट अटॅक’, त्या मिस्ट्रीबॉयसोबत प्राजक्ता माळीला पाहून चाहत्यांना बसला धक्का ‘हे आमचे भावोजी का?.. ऑलमोस्ट हार्ट अटॅक’, त्या मिस्ट्रीबॉयसोबत प्राजक्ता माळीला पाहून चाहत्यांना बसला धक्का
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. प्राजक्ता कोणाला डेट करत आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वजण...
दीपिका पदूकोण बनली शाहरूख खानच्या लेकीची आई; यामागचं कारण फारच खास
वडील ख्रिश्चन आणि आई शीख, भाऊ धर्म बदलून मुस्लिम झाला; लो बजेट सिनेमाने अभिनेत्याला बनवले स्टार
टुथब्रश तुम्हाला आजारी पाडू शकतो, मग केव्हा बदलायचा ? 3,6 की 12 महिन्यांनी ?
Pumice Stone Benefits- तुमच्या पायांनाही पडतात का भेगा? हा एक साधा सोपा उपाय नक्की करुन पाहा 
Summer Recipes- ‘या’ चटण्या उन्हाळ्यात तुमच्या आहारात असायलाच हव्यात!
Summer Icecream Recipes- साध्या सोप्या पद्धतीने तुम्हीही घरी आइस्क्रीम करुन बघा!