पेट्रोल आणि डिझेलवर 2 रुपये उत्पादन शुल्क वाढलं, मात्र दर वाढणार नाहीत; वाचा सविस्तर
सोमवारी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ केली. मात्र ग्राहकांना याचा फटका बसणार नाही, असं स्पष्टपणे केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने सांगितलं आहे. कारण उत्पादन शुल्कात केलेली वाढ ही तेल कंपन्या भरणार आहे. यामुळे सामान्य नागरिकांना जादा पैसे मोजावे लागणार नाही.
जागतिक स्तरावर तेलाच्या किमतींमध्ये सुरू असलेल्या चढउतार आणि ट्रम्प प्रशासनाने प्रत्युत्तरात्मक टॅरिफची घोषणा केल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असं सांगण्यात येत आहे. दरम्यान, सध्या मुंबईत पेट्रोलची किंमत 103. 44 रूपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 89.97 रूपये प्रति लिटर आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List