Hair Care- केसगळती रोखण्यासाठी कांदा आहे वरदान! वाचा सविस्तर

Hair Care- केसगळती रोखण्यासाठी कांदा आहे वरदान! वाचा सविस्तर

आपल्या आरोग्यासाठी कांद्याचे फायदे हे खूपच अदभूत आहेत. कांद्यामुळे आपल्या हृद्याचे आरोग्य सुधारते. तसेच कांद्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. पण केवळ इतकेच नाही तर, कांदा आपल्या आरोग्यासोबत आपल्या केसांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. कांद्यामुळे केसगळती तर थांबते, शिवाय केसवाढीसाठी कांदा हा खूप महत्त्वाचा मानला जातो. कांदा केसांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. कांदा हा आपल्या भारतीयांच्या किचनमध्ये अगदी सहज उपलब्ध असतो. मुख्य म्हणजे केसांच्या वाढीसाठी कांद्याचा रस चांगला स्रोत आहे. कांद्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट, अँटी-सेप्टिक, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म चांगले असतात. यामुळे केसांचे संरक्षण होण्यास मदत होते.

 

केसगळतीवर कांद्याचा वापर कसा करावा?

मध आणि कांद्याचा रस– केस कोरडे झाले असतील तर, कांद्याचा आणि मधाचा रस हा खूप उपयोगी आहे. मधामुळे आपल्या केसांना चांगले कंडिशनिंग होण्यास मदत होते. तर कांद्याच्या रसामुळे केस निरोगी आणि हायड्रेटेड राहण्यास मदत होते. कांद्याचा रस हा केसवाढीसाठी उत्तम मानला जातो.

एका भांड्यात कांद्याचा रस आणि मध मिसळून मिश्रण तयार करा. आता हा रस आपल्या केसांच्या मुळाशी लावावा. रस लावून झाल्यानंतर गोलाकार पद्धतीने मालिश करावे आणि त्यानंतर अर्ध्या तास हा रस तसाच ठेवून द्यावा. अर्ध्या तासानंतर व्यवस्थित शॅम्पोने केस धुवावे. हा उपाय आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा करावा.

 

लिंबु आणि कांद्याचा रस– मजबूत केसांसाठी आपण लिंबाचा रस आणि कांद्याचा रसाचा वापर करु शकतो. लिंबामध्ये व्हिटॅमिन-सी हे खूप मुबलक प्रमाणात असते. व्हिटॅमिन सी हे कोलेजनच्या निर्मितीस मदत करतात. आपल्या केसांच्या मूळांना बळकट करण्यासाठी आणि निरोगी बनविण्याकरता व्हिटॅमिन सी हे खूप गरजेचे आहे. लिंबाचा आणि कांद्याचा रस हा डोक्यातील कोंडा दूर करण्यात मदत करतो तसेच केसांचे आरोग्यही उत्तम ठेवतो.

एक चमचा कांद्याचा रस आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळून मिश्रण तयार करा. आता हे मिश्रण आपल्या केसांच्या मूळाशी लावावे. एक तास हे मिश्रण केसांवर तसेच ठेवून, नंतर केस धुवावे.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चीनच्या निर्णयामुळे ट्रम्प चौताळले; दिली नवी धमकी चीनच्या निर्णयामुळे ट्रम्प चौताळले; दिली नवी धमकी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील देशांवर टॅरिफ लादल्याने जगभरात अस्वस्थता वाढली आहे. अमेरिकेने लादलेल्या टॅरिफला प्रत्युत्तर म्हणून चीनने अमेरिकन...
IPL 2025 – हार्दिक-तिलकची वादळी खेळी व्यर्थ, RCB ने 10 वर्षांनी “वानखेडे” जिंकलं; मुंबईचा 12 धावांनी पराभव
महागाईने पिचलेल्या जनतेचे या दरवाढीने कंबरडे मोडणार आहे – सतेज पाटील
भक्तांनी लोकांचे खिसे कापणाऱ्या ‘या’ निर्णयाचे स्वागत करावं, अंबादास दानवे यांचा टोला
Nanded News – आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टेबाजी करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल, मुद्देमाल जप्त
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला हिंदुस्थानात आणण्याचा मार्ग मोकळा; अमेरिकेच्या कोर्टाने याचिका फेटाळली
ऑर्डर केली व्हेज बिर्याणी, पार्सलमध्ये आली नॉनव्हेज बिर्याणी; रेस्टॉरंट संचालक पोलिसांच्या ताब्यात