Vicky Kaushal- ‘छावा’च्या यशानंतर विकीची जादू कायम राहणार, नव्या चित्रपटाच्या पोस्टरची सर्वत्र चर्चा!
अभिनेता विकी कौशल हा सध्याच्या घडीला त्याच्या करिअरमधील एका उंचीवर पोहोचला आहे. म्हणूनच विकीच्या चित्रपटांबद्दल त्याच्या चाहत्यांमध्येही उत्सुकता आहे. ‘छावा’च्या अभूतपूर्व यशानंतर, विकीचा चांगलाच दबदबा निर्माण झालेला आहे. छावा चित्रपटानंतर आलेल्या या जादूगारच्या पोस्टरने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. आता विकी या चित्रपटातून आपल्याला जादूगाराच्या भूमिकेत दिसणार आहे.
‘छावा’ चित्रपटाच्या माध्यमातून विकी कौशलने बॉक्स ऑफिसवर चांगलेच वर्चस्व गाजवले. प्रेक्षकांनी विकीच्या छावाला अक्षरशः डोक्यावर उचलून धरले. ‘एक जादूगार’ हा चित्रपट शुजित सरकार याने दिग्दर्शित केलेला आहे. शुजित सरकारने पिकू, ऑक्टोबर यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. जादूगारची निर्मिती रायझिंग सन फिल्म्स करत आहे. जादूगाराच्या ड्रेसमध्ये विकी वाहवा मिळवत आहे. केवळ इतकेच नाही तर, त्याच्या या लूकवर चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
एक जादूगार या चित्रपटाचा फर्स्ट लूक बघून, एका चाहत्याने लिहिले आहे की, हे खरंच खूप इंटरेस्टींग दिसत आहे. तर दुसऱ्या एका चाहत्याने ‘मला त्याचा नवीन अवतार खूप आवडला.’ असे म्हटले आहे.
विकी कौशलच्या ‘छावा’ने बॉक्स ऑफिसवर विक्रम रचला. आगामी काळात विकी कौशल लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List