दिव्या भारतीच्या मृत्यूचं रहस्य, ‘त्या’ दिवशी नक्की काय झालेलं, प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?
Divya Bharti Death: ‘सात समंदर पार मैं तेरे पीछे – पीछे आ गई…’ हे गाणं आजही कोणत्या कार्यक्रमात, पार्टीत वाजतं आणि गाण्याचा लोकं आनंद घेतात. पण गाण्यावर सर्वांना ताल धरायला लावणाऱ्या अभिनेत्रीच्या मृत्यूचं रहस्य अद्यापही गुलदस्त्यातच आहे. दिवंगत अभिनेत्री दिव्या भारती हिच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलं होतं. 1993 मध्ये वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी दिव्या भारती हिचं निधन झालं. पाचव्या मजल्यावरुन पडून अभिनेत्रीचा मृत्यू झाला… असं सांगण्यात येत. पण आजही मृत्यूचं रहस्य गुलदस्त्यात आहे. त्या दिवशी नक्की काय झालं होतं यावर प्रत्यक्षदर्शींनी मोठा खुलासा देखील केला.
सांगायचं झालं तर, 1993 मध्ये अभिनेत्रीचं निधन झाल्यानंतर 1998 मध्ये केसचा तपास करत असताना मुंबई पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दिला आणि प्रकरण बंद केलं. प्रथम दृष्ट्या हे प्रकरण एक अपघात असल्याचं समोर आलं. पण आजही दिव्याच्या मृत्यूच्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात.
दिव्या भारती हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, 9 वीत असताना दिव्या भारतीने शिक्षण सोडलं आणि मॉडेलींगला सुरुवात केली. वयाच्या 14 व्या वर्षी दिव्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय मॉडेल म्हणून नावारुपास आली. त्यानंतर दिव्याने तेलूगू ‘बोब्बिली राजा’ सिनेमातून अभिनय विश्वात पदार्पण केलं. ज्यामुळे दिव्याच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली.
1992 मध्ये अभिनेता शाहरुख खान आणि दिवंगत अभिनेत्री ऋषी कपूर यांच्यासोबत स्क्रिन शेअर करत दिव्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यानंतर अभिनेत्रीने फिल्म मेकर साजित नाडियाडवाला याच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला.
साजित नाडियाडवाला सोबत लग्न केल्यानंतर दिव्या तिच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी नव्हती. अशात दिव्याने सतत दारु पिण्यास सुरुवात केली. 5 एप्रिल 1993 मध्ये दिव्याने तिच्या घरात एक पार्टी ठेवली होती. पार्टीमध्ये फॅशन डिझायनर निता लुल्ला आणि तिचे पती डॉ. श्याम लुल्ला देखील होते. घरात अमृता नावाची मदतनीस देखील होती.
निता आणि तिच्या पतीने सांगितल्यानुसार, दिव्या अशा खिडकीवर बसली होती, जिला ग्रील नव्हती. नशेत दिव्याने उठण्याचा प्रयत्न केला. पण तिचं स्वतःवर असलेलं नियंत्रण सुटलं. अभिनेत्री पाचव्या मजल्यावरुन खाली पडली आणि बॉलिवूडने दिव्या भारतीला गमावलं.
पाचव्या मजल्यावरून खाली पडल्यानंतर तात्काळ अभिनेत्रीला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण दिव्याचं निधन झालेलं होतं. ही आत्महत्या होती, हत्या होती की अपघात होता… हे सत्य आजही गुढ रहस्य आहे.
मृत्यूपूर्वी दिव्या भारतीचं धक्कादायक वक्तव्य, ‘माझं होणारं बाळही…’
दिव्याच्या मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी दिव्या आणि सोनम खानचं फोनवर बोलणं झालं होतं. सोनम एका मुलाखतीत म्हणाली, ‘दिव्या मला म्हणाली होती चंद्र बघ… माझं होणारं बाळ देखील माझ्या सारखं सुंदर असेल…. दिव्या एक अशी अभिनेत्री होती, जिच्यासोबत माझी घट्ट मैत्री होती. आता दिव्या जिथे कुठे असले, तिथे आनंदी असेल… एवढंच सांगू शकते. आणखी तिच्याबद्दल काय बोलणार..’ असं देखील अभिनेत्री सोनम खान म्हणाली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List