महसूल सचिव असल्याचे सांगून नोकरीच्या आमिषाने गंडा; महसूल विभागातील क्लार्कसह दोघांना अटक, बनावट नियुक्तिपत्रे, शिक्के, लेटरपॅड मिळाले

महसूल सचिव असल्याचे सांगून नोकरीच्या आमिषाने गंडा; महसूल विभागातील क्लार्कसह दोघांना अटक, बनावट नियुक्तिपत्रे, शिक्के, लेटरपॅड मिळाले

महसूल, पोलीस आणि वन विभागात नोकरीच्या आमिषाने फसवणूक करीत लाखो रुपये उकळणाऱ्या एकाला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली. आरोपी स्वतः महसूल सचिव असल्याचे सांगत होता. या आरोपीला बनावट नियुक्तिपत्रे बनवून देण्यामध्ये पुणे महसूल कार्यालयातील सहायक क्लार्कचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यालाही पोलिसांनी अटक केली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

महादेव बाबूराव दराडे (32, रा. वाकड, मूळ. रा. धाराशिव) आणि रणजीत लक्ष्मण चौरे (35, रा. धायरी. मूळ. रा. बीड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील चौरे हा पुणे महसूल कार्यालयात सहायक क्लार्क म्हणून कामाला आहे. एका 22 वर्षीय तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दराडे याच्यावर 10 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दराडे हा रिअल इस्टेट एजंट म्हणून काम करतो. कामानिमित्ताने शासकीय कार्यालयात ये-जा असल्याने तो अनेकांना महसूल सचिव असल्याचे सांगत होता. फिर्यादीची एकाच्या माध्यमातून दराडे याच्याशी ओळख झाली. त्यानंतर दराडेने तरुणाचा विश्वास संपादित करून तरुणाला पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती देतो, असे सांगून 2022 ते 25 या तीन वर्षांत वेळोवेळी दहा लाख रुपये घेतले. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू होता. दरम्यान, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी यांना मिळालेल्या माहितीनुसार दराडे याला पथकाने अटक केली. त्याची चारचाकी गाडी तसेच वाकड येथील घरातून पोलिसांना बनावट कागदपत्रे सापडली. अनेक नियुक्तिपत्रे, लेटरपॅड, शिक्के मिळाले आहेत. या पद्धतीने दराडे याने राज्यातील पंधरा ते वीसजणांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. या गुन्ह्यात दराडे याला चौरे हा बनावट नियुक्तिपत्रे बनवून देण्यात मदत करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी चौरे यालाही अटक केली. अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट दोनचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक निरीक्षक अमोल रसाळ, अंमलदार शंकर नेवसे, उज्वल मोकाशी, पुष्पेंद्र चव्हाण, विनोद चव्हाण, राहुल शिंदे, नागेश राख, संजय जाधव, विजय पवार यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.

20 ते 25 जणांच्या फसवणुकीची शक्यता

दराडे याने महसूल सचिव अशी ओळख सांगून राज्यभरातील 20 ते 25 जणांची फसवणूक केल्याची प्राथमिक शक्यता आहे. त्याच्याकडून पोलीस, वन आणि महसूल विभागाची बनावट नियुक्तिपत्रे, शिक्के, लेटरपॅड आदी कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. त्यामुळे आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

आरोपींकडून अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. प्राथमिक तपासात त्याने अशाप्रकारे राज्यातील आणखी काहीजणांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. कुणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क करावा.

– प्रताप मानकर, पोलीस निरीक्षक, युनिट दोन.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मनोज कुमार यांच्या प्रार्थना सभेत इतक्या चिडल्या जया बच्चन, थेट महिलेचा हात पकडला अन्.. मनोज कुमार यांच्या प्रार्थना सभेत इतक्या चिडल्या जया बच्चन, थेट महिलेचा हात पकडला अन्..
ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन नेहमीच त्यांच्या तापट स्वभावामुळे चर्चेत असतात. पापाराझी आणि माध्यमांसमोर त्यांना अनेकदा चिडताना पाहिलं गेलंय....
अवैध विवाहातून जन्मलेल्या मुलांनाही मालमत्तेत हक्क, हायकोर्टाचा निर्वाळा
मुस्लिम आरक्षणाविरोधात कर्नाटक भाजपचे 16 दिवस आंदोलन 
चित्रपटांच्या चित्रीकरणातून मध्य रेल्वेची 40 लाखांची कमाई, निर्मात्यांची सीएसएमटी, आपटा स्थानकाला सर्वाधिक पसंती
महाराष्ट्रासह उत्तर हिंदुस्थान तापला; 21 शहरांमध्ये तापमान 41 अंशांवर पोहचले
मालेगाव बाम्बस्फोट खटला विशेष न्यायाधीशाची बदली
रामनवमीला काळाराम मंदिरात शासकीय महापूजा व्हावी; शिवसेनेची मागणी