‘माधुरी सडपातळ आहे, म्हणून तिच्यासोबत…’, ‘धकधक गर्ल’बद्दल प्रसिद्ध सेलिब्रिटीचं हैराण करणारं वक्तव्य
बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षित हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज माधुरी बॉलिवूडमध्ये पूर्वी प्रमाणे सक्रिय नसली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. एका काळ असा देखील जेव्हा माधुरी तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी मात्र प्रेम प्रकरणांमुळे अधिक चर्चेत राहिली.
लग्नाआधी माधुरी दीक्षित हिचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. यामध्ये अभिनेता संजय दत्त याचं देखील नाव आहे. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अभिनेत्रीचे कुटुंबिय दोघांच्या नात्याच्या विरोधात होते. शिवाय तेव्हा संजूबाबा विवाहित देखील होता.
असं देखील सांगितलं जातं की, माधुरीच्या आई – वडिलांना अभिनेत्रीचं लग्न लवकर करायचं होतं. त्यामुळे ‘धकधक गर्ल’चे आई – वडील चांगल्या मुलाच्या शोधात होते. तेव्हा अभिनेत्रीचे आई – वडील लेकाच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी 11 वर्ष मोठ्या सुरेश वाडकर यांच्याकडे गेले.
पण सुरेश वाडकर यांनी माधुरी दीक्षित सोबत लग्नाला नकार केली. लग्नासाठी नकार देत सुरेश वाडकर म्हणाले, ‘मी माधुरीसोबत लग्न करु शकत नाही, ती प्रचंड सडपातळ आहे…’, माधुरीसोबत लग्नाला नकार दिल्यामुळे माधुरीचे आई – वडील निराश झाले होते.
अखेर माधुरी हिचं लग्न तिच्यपेक्षा 8 वर्ष मोठे डॉक्टर श्रीराम नेने यांच्यासोबत झालं. माधुरी आणि नेने यांना दोन मुलं देखील आहेत. अभिनेत्री कायम पती आणि मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
माधुरी आता मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List