प्रशांत कोरटकर पळून गेला असेल तर ते गृहखात्याच्या मदतीशिवाय शक्य नाही, संजय राऊत यांची टीका

प्रशांत कोरटकर पळून गेला असेल तर ते गृहखात्याच्या मदतीशिवाय शक्य नाही, संजय राऊत यांची टीका

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी अटकेची टांगती तलवार असलेला प्रशांत कोरटकर हा दुबईला पळून गेल्याचे वृत्त समोर आले आहे. अद्याप याबाबत दुजोरा मिळालेला नसला तरी कोरटकरचे दुबईतील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यावर बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपला फटकारले आहे.

”प्रशांत कोरटकर यांचा विषय महाराष्ट्रातल्या गृहखात्याच्या अखत्यारितला आहे. हे खातं देवेंद्र फडणवीस सांभाळतात. जे एक महान व्यक्तीमत्तव आहेत. त्यांची अलीकडीच वक्तव्य पाहिली तर त्यांच्या इतकं महान व्यक्तिमत्त्व या देशात नाहीए. कोरटकर हा नागपूरचाच आहे, दंगल नागपूरलाच झाली. त्यांच्या मतदारसंघातच दंगल झाली. दंगलीविषयी शंका व्यक्त करणाऱ्यांना मानसिक उपचाराची गरज असल्याचे ते बोलत होते. पण दंगल नागपूरलाच का झाली हा एकट्या संजय राऊत यांचा प्रश्न नाही. हा प्रश्न आदित्य ठाकरेंनीही विचारला. हा प्रश्न इम्तियाज जलिल यांनीही विचारला. फडणवीसांचं हे सरकार मानसिक रुग्णांचं सरकार आहे, त्यांच्यावर सामुदायिक मानसोपचार करण्याची गरज आहे. कोरटकर हा नागपूरचा त्यांचाच माणूस आहे. तो पळून गेला की नाही हे ते सांगतील. आम्ही म्हणालो तो पळून गेला आणि मग तो भाजपच्या एखाद्या मंत्र्याच्या बंगल्यात सापडेल, कार्यालयात सापडायचा. वर्षा बंगल्यावर सापडायचा. भाजपच्या राजवटीत काहीही होऊ शकतं. खरोखर कोरटकर पळून गेला असेल तर गृहखात्याच्या मदतीशिवाय तो पळून जाऊ शकत नाही. फडणवीसांचे पोलीस किती सक्षम आहेत ते आपण पाहतोच. जे विरोधक आहेत त्यांना ते बरोबर पकडतात. पण या पोलिसांना कृष्णा आंधळे, कोरटकर सापडत नाही. एक असा आरोपी ज्याचा जामीन नाकारलेला आहे. ज्याने महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. तो पळून गेला. दंगलीतले आरोपी पकडले ना तुम्ही. पण ज्याला खरोखर पकडायचा होता तो पळून गेला. ज्या दिवशी त्याला कोर्टाने जामीन नाकारला तेव्हा तो नागपूरमध्येच होता. ही नागपूरच्या पोलिसांची जबाबदारी आहे. जर तो खरोखर पळून गेला असेल तर नागपूरच्या आयुक्तांचा राजीनामा घेतला पाहिजे किंवा त्यांची बदली केली पाहिजे. खरं म्हणजे गृहमंत्र्यांनी जबाब द्यायला पाहिजे पण आपले गृहमंत्री पतंग उडवत बसतात. पण पतंग फाटलीय त्यांची”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

”दंगल घडवणारी यांचीच लोकं आहेत. आमचं सरकार असताना दंगली घडल्या नाहीत. या आधीही मनोहर जोशी, नारायण राणे, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही दंगली घडल्या नाहीत. शिवसेना फडणवीसांसोबत अशतानाही दंगल घडली नाही. आताच कशी दंगल घडली. औरंगजेबाची कबर उखडा लोकं तुमच्यासोबत आहेत त्यांच्यावर कारवाई करतायत का तुम्ही? दंगलीला खतपाणी घालणारी लोकं तुमच्या कॅबिनेटमध्ये आहेत, विधीमंडळात बसून, नरडी गरम करून वातावरण पेटवणारी लोकं तुमच्यासोबत बसले आहेत. तुम्ही चिल्ल्यापिल्ल्यांवर कारवाई केली. मुख्य आरोपी तुमच्या कॅबिनेट मध्ये बसले आहेत. म्हणून मी म्हणतो हे सरकार मानसिकदृष्ट्या भ्रष्ट, विकलांग व मनोरुग्ण झालं आहे. सरकारमध्ये जे आहेत त्यांच्यावर कारवाई का करू नये. सरकारमध्ये बसलेले त्यांचे बाप आकाशातून पडलेले आहेत का? तुम्ही राज्यकर्ते आहात, तुम्ही संयमाने वागलं पाहिजे व बोललं पाहिजे. ज्या पद्धतीची भाषा फडणवीसांचे सहकारी वापरतात ही भाषा महाराष्ट्राला शोभणारी नाही, असेही संजय राऊत म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तीन वर्षांत सहा लाख कर्मचाऱ्यांची नोकरी गेली! कंपन्यांची खर्चकपात कर्मचाऱ्यांच्या पोटावर तीन वर्षांत सहा लाख कर्मचाऱ्यांची नोकरी गेली! कंपन्यांची खर्चकपात कर्मचाऱ्यांच्या पोटावर
कंपन्यांनी खर्च कमी करण्याच्या नावाखाली गेल्या तीन वर्षांत जवळपास 5.8 लाख कर्मचाऱ्यांना कामांवरून काढून टाकले आहे. 2023 मध्ये कंपन्यांनी 2...
हे कोर्टरूम आहे, सिनेमा हॉल नाही! सुनावणीसाठी थेट शौचालयातून उपस्थित राहणाऱ्या आरोपीला कोर्टाने झापले 
वैष्णोदेवी दर्शनासाठी आता थेट फ्लाईट
हिंदुस्थान-फ्रान्स नौदलाचा अभ्यास
धक्कादायक! ओडिशात रोज 3 बालविवाह
नौदलात 29 मार्चपासून अग्निवीर पदांची भरती
कुवेतमध्ये 42 हजार जणांचे नागरिकत्व धोक्यात