आमचं फक्त लग्न झालंय पण ती दुसऱ्या पुरुषांसोबत…या अभिनेत्रीच्या नवऱ्याचा गंभीर आरोप
बॉलिवूड असो किंवा टिव्ही इंडस्ट्री जवळपास प्रत्येक सेलिब्रिटींबद्दल काहीना काही चर्चा होताना दिसते. या सेलिब्रिटींच्या चित्रपट, मालिकांपेक्षा जास्त चर्चा ही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल होत असते. आता एका अभिनेत्रीबद्दल अशीच एक चर्चा होताना दिसत आहे. ही चर्चा तिच्या पतीने तिच्यावर केलेल्या विवाहबाह्यसंबंधावरून केलेल्या गंभीआरोपांमुळे होत आहे.
पवित्रा पुनिया सिंगल नसून विवाहित आहे?
ही अभिनेत्री आहे पवित्रा पुनिया, आणि ती सिंगल नसून विवाहित आहे. अभिनेत्री पवित्रा पुनिया ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे, जी तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. पवित्रा पुनियाने खलनायिकेपासून ते विनोदी भूमिकेपर्यंत प्रत्येक भूमिकेत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तथापि, ही अभिनेत्री गेल्या काही काळापासून तिच्या व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. खरं तर, अनेक प्रसंगी, अभिनेत्री तिच्या भांगेत सिंदूर लावताना दिसते. ज्याबद्दल लोक नेहमीच तिला विचारताना दिसतात की, ती नक्की कोणाच्या नावाचा सिंदुर लावते. कारण ती विवाहित आहे हे तिने अद्यापर्यंत लपवून ठेवले आहे.

पवित्राच्या कथित नवऱ्याची मुलाखत व्हायरल
दरम्यान तिच्या सिंदुर लावण्याबद्दल तिने उत्तर देताना, एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की ती देवाच्या नावाने सिंदूर लावते. मात्र अलिकडेच एका व्यावसायिकाची जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो पवित्रा पुनियाशी लग्न केल्याचा दावा करताना दिसत आहे. एवढेच नाही तर त्या व्यक्तीने पवित्रा पुनियाबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले.
सुमितचे पवित्रावर गंभीर आरोप
सुमितने अभिनेत्रीवर गंभीर आरोप केले होते.या व्यक्तीचे नाव सुमित माहेश्वरीने आहे. तो एक मोठा बिझनेसमॅन आहे. हॉटेल व्यावसायिक सुमित माहेश्वरी याने पवित्रा पुनियाबद्दल सांगितले होते की त्यांचे लग्न अभिनेत्रीशी झाले होते पण लग्नानंतर तिने त्यांना चार वेळा त्याला फसवले आहे. तसेच तिचे दुसऱ्या पुरुषांसोबत अफेअर होते.
पवित्रा पुनियावर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप
एवढंच नाही तर सुमितने पवित्रा पुनियावर विवाहबाह्य संबंध असल्याचा त्याने आरोप केला होता. त्याने पारस छाबरा आणि प्रतीक सहजपाल यांचेही नाव घेतले होते. सुमितने त्याच्या मुलाखतीत पुढे सांगितले की, ‘जेव्हा मला त्यांच्या नात्याबद्दल कळले तेव्हा मी पारसला मेसेज केला होता. मी त्याला सांगितले की तू पवित्रासोबत नातेसंबंधात राहू शकतोस, पण घटस्फोट होईपर्यंत वाट पाहा”. सुमितने ही मुलाखत 2020 मध्ये दिली होती. अजूनही दोघे पती-पत्नी आहेत, त्यांचा घटस्फोट झालेला नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List