‘दबंग’गिरीला धक्का,‘फ्लॉप’चा ‘सिकंदर’!प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याने शो रद्द
बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या चित्रपटांचा नेहमीच बोलबाला राहिला आहे, परंतु ईदीचे औचित्य साधून 30 मार्चला प्रदर्शित झालेल्या सिकंदर चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. देशातील विविध भागात थिएटरमध्ये अपेक्षित प्रेक्षक पोहोचत नसल्याने चित्रपटाचे अनेक शो रद्द केले जात आहेत. सिकंदरला सुरत, अहमदाबाद, भोपाळ आणि इंदूरमधील अनेक चित्रपटगृहांमधून काढून टाकण्यात आले आहे. कांदिवली, मुंबई येथील आयनॉक्स रघुलीला येथे सायंकाळी 5.30 वाजता होणारा सिकंदरचा शो आता उंबारो या चित्रपटाने बदलला आहे. सिकंदरचा रात्री 9.30 वाजताचा शोदेखील काढून टाकण्यात आला आह़े सिनेपोलिस सीवूड आणि पीव्हीआर ओरियन मॉलमधील रात्री 9.30 आणि संध्याकाळी 5.30 वाजेच्या शोने मोहनलालच्या ‘एल 2 ः एम्पुरन’ या चित्रपटाने जागा घेतली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List