कुंपणाने शेत खाल्ल्याची दाट शक्यता…थकीत आयकर जुळवताना अधिकाऱ्यांना घाम! 70 लाखांची रक्कम रात्रीतून दीड कोटी कशी?

कुंपणाने शेत खाल्ल्याची दाट शक्यता…थकीत आयकर जुळवताना अधिकाऱ्यांना घाम! 70 लाखांची रक्कम रात्रीतून दीड कोटी कशी?

‘दैनिक सामना’ने 1 एप्रिल रोजी ‘परतूर तालुक्यात शिक्षकांच्या पगारातून कपात केलेला आयकर भरलाच नाही; गटसाधन केंद्रात आयकराचा सावळा गोंधळ’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसारित केले होते. या वृत्ताच्या दणक्याने तालुक्यातील आयकर भरणाऱ्या अधिकाऱ्यांना घाम फुटला असून, अनेक शिक्षकांनी गटसाधन केंद्रात येऊन आयकराबाबत विचारणा केली. यामध्ये काही शिक्षकांना आयकर भरल्याच्या पावत्या दाखवल्या. मात्र प्रकरण अंगाशी येण्याच्या धास्तीने यंत्रणेने थकीत आयकर भरण्यासाठी आकड्यांची जुळवाजुळव केली. यामुळे शिक्षकांनी ‘दैनिक सामना’चे आभार मानले आहेत.

कुंपणानेच शेत खाणे म्हणजे ज्याला शेत राखायला दिले, त्याने त्या शेताचे रक्षण करावे, सांभाळावे अशी अपेक्षा असते, चोरी केली. यालाच कुंपणानेच शेत खाल्ले असे म्हणतात. अगदी असाच प्रकार परतूर गट साधन केंद्रात सुरु असल्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना आयकर पात्र शिक्षकांना वर्षातून एकदाच आयकर भरण्याचे दडपण येऊ नये म्हणून त्यांच्या पगारातून दरमहा काही रक्कम कपात केली जाते व ती मुख्याध्यापकांमार्फत गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या खात्यातून दरमहा, त्रैमासिक, सहा महिन्याने किंवा वर्षातून एकदा म्हणजे चालू आर्थिक वर्ष ३१ मार्च पर्यंत आयकर विभागात जमा करावी लागते. यामुळे शिक्षक यांच्यावर ताण पडत नाही. सरकारला ही आयकराच्या माध्यमातून जण-सामान्यांच्या विकासासाठी पैसा उपलब्ध होतो.

कुंपणानेच शोत खाल्ले!

परतूर तालुक्यात गटशिक्षण अधिकारी संतोष साबळे यांनी शिक्षकांच्या पगारातून दर महिन्याला आयकर कपात केला. ज्या शिक्षकांनी महिन्याला आयकर जमा केला अशा काही शिक्षकांचे पगार थकविले. एवढे करूनही गेली अनेक महिन्याचा आयकर आर्थिक वर्ष 2025 संपले तरीही थकीत रक्कम भरलेली नाही. तालुक्यातील शेकडो शिक्षकांचा कपात केलेला आयकर शासनाकडे न जमा करणातऱ्या गट शिक्षणाधिकारी साबळे यांच्यावर शासन काय कारवाई करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पगारारतून कपात केलेला आयकर व्यवस्थित सांभाळून शासनाकडे जमा करण्यासाठी दिलेली रक्कम साबळे यांनी वेळेवर न भरणे म्हणजे कुंपणाने शेत खाल्ल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे अनेक शिक्षकांना आयकर विभागाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल असे चित्र आहे.

10-15 लाखांची रोकड काढली, गटशिक्षणाधिकाऱ्यांची कबुली

दर महिन्याला शिक्षकांच्या पगारातून कपात केलेला आयकर हा 31 मार्चअखेर आयकर विभागाच्या खात्यात वर्ग केला असे अधिकारी सांगतात. आज दैनिक सामनाच्या प्रतिनिधीने आयकर खात्याचे बँक स्टेटमेन्ट पाहण्यासाठी साबळे यांच्याकडे चौकशी केली. यावर सदरील खात्यातून 5-10, 10-15 लाख रक्कम काढली गेली अशी प्रत्यक्ष कबुली दिली. यावर गटविकास अधिकारी राजेश तांगडे व वरिष्ठ काय कारवाई करणार. तसेच अपहाराची ही रक्कम नेमकी किती ते बैंक स्टेटमेंट हातात आल्यावर कळेलच. सद्या स्टेटमेंट देऊ शकत नाही, जरा थांबा, मी खूप अडचणीत आहे अशी उत्तरे मिळाली. याचा अर्थ या खात्यातून किमान 70 लाख ते 1 कोटी रु. काढल्याचा अंदाज आहे. या बाबत गटशिक्षणाधिकारी हे अजूनही गप्प का आहेत हा प्रश्न कायम आहेच.

या प्रकरणाचा गटसाधन केंद्रापासून ते जिल्हा शिक्षणाधिकारी (प्रा.) कार्यालयापर्यंत पाठपुरावा करणारे कन्हाळा शाळेचे मुख्याद्यापक रामेश्वर हातकडके यांना साबळे यांनी 30 मार्च रोजी 70 लाख जमा असल्याचे सांगितले होते. मात्र हाच आकडा रात्रीतून 31 मार्च रोजी 1 कोटी 32 लाख जमा असल्याचे गटशिक्षणाधिकारी संतोष साबळे यांनी सांगितले. एवढे पैसे रात्रीतून खात्यावर कोठून आले हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

योग्य कारवाई करावी

मार्च 2023 मध्ये भगवानबाबा वाडी, केंद्र कन्या, आष्टी या शाळेने मासिक आयकर कपात न केल्यामुळे संबंधित शाळेचे मुख्याध्यापक मल्लाडे डी.टी. व त्यांचे सहकारी मुंडे यु.बी. यांचा एक महिन्याचा पगार 2 महिन्यासांठी गटशिक्षणाधिकारी परतूर संतोष साबळे यांनी थांबवला होता. मात्र यांनी तर कपात करून वर्षभर भरलाच नाही. याबद्दल त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी. अशी मागणी शिक्षकांमधून केली जात आहे. आमच्या प्रतिनिधीच्या हाती आयकराबाबत बैंक स्टेटमेंट आल्यानंतर खरा अपहार किती झाला, कोणी कोणी केला याविषयी कोणत्याही दबावाला न भिता निर्भीडपणे सविस्तर माहिती पुढील भागात प्रसारित केल्या जाईलच.

चौकशीची मागणी करणाऱ्यांना धमकी

या विषयी हातकडके व मुख्याध्यापक संघटनेच्या यांनी वरिष्ठांकडे निवेदन दिले होते. ते काही पत्रकारांच्या हाती लागले. यावर पत्रकारांनी गटसाधन चे संतोष साबळे यांना सविस्तर माहिती विचारली होती. त्यावर माध्यमप्रतिनिधी यांनाही समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत. साबळे व हातकडके यांच्या निवेदनाच्या आधारे माध्यम प्रतिनिधी यांनी आयकराबाबत तालुक्यातील शिक्षकांना न्याय मिळावा म्हणून सत्य परिस्थितीचे वृत्त प्रसारित केले. म्हणून गटशिक्षणाधिकारी साबळे हे हातकडके याना धमक्या देत आहेत. अशा आशयाच्या पोस्ट हातकडके यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केल्या आहेत. याबाबत रामेश्वर हातकडके यांना संपर्क केल्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी सद्या या विषयी काहीच प्रतिक्रिया देणार नाही मात्र दोन तीन दिवसात सविस्तर माहिती देतो असे सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

इस्रायलचे गाझावर रात्रभर हल्ले; 50 हून अधिक पॅलेस्टिनी ठार इस्रायलचे गाझावर रात्रभर हल्ले; 50 हून अधिक पॅलेस्टिनी ठार
इस्रायलने गाझा पट्टीत रात्रभर केलेल्या हल्ल्यात 50 हून अधिक पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले. लवकरच इस्रायल गाझामधील मोठय़ा भागावर कब्जा करेल...
लढाऊ विमानाला अपघात; न्यायालयीन चौकशीचे आदेश
अमेरिकेतील हिंदुस्थानीला 35 वर्षांचा कारावास
12, 13 एप्रिलला बीकेसीत कॉमिक कॉन
थोडक्यात – भायखळ्यात शनिवारी रंगणार होम मिनिस्टरचा खेळ
Waqf Amendment Bill 2025 – वक्फ विधेयक लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजूर, 128 विरुद्ध 95 मते
अदानी कर लादल्यामुळे मुंबईकरांवर आर्थिक ताण, कचरा शुल्कावरून आदित्य ठाकरे यांचं पालिका आयुक्तांना खरमरीत पत्र