माळीणचे दरडग्रस्त मुरबाडमध्ये भोगतायत नरकयातना, वीज, रस्ता, शाळा नाही; रोजगार नसल्याने उपासमार

माळीणचे दरडग्रस्त मुरबाडमध्ये भोगतायत नरकयातना, वीज, रस्ता, शाळा नाही; रोजगार नसल्याने उपासमार

30 जुलै 2014 रोजी पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर महाकाय दरड कोसळून अख्खे गाव ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या भयानक दुर्घटनेत दीडशेहून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला. यात कसेबसे वाचलेल्या 20 कुटुंबांचे वनखात्याने मुरबाड तालुक्यातील साखरमाची गावात पुनर्वसन केले खरे पण त्यांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे. घरांमध्ये वीज तर सोडाच, गावात जायला रस्तादेखील नाही. रोजगार उपलब्ध नसल्याने येथील कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असून मुलांना शाळा नसल्यामुळे त्यांच्या भवितव्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. माळीण दरडग्रस्त कुटुंबे त्या भयंकर दुर्घटनेतून वाचले. परंतु सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे मुरबाडमध्ये अक्षरशः नरकयातना भोगत आहेत. मुरबाडच्या साखरमाची येथील साजई गावात शंकर देसले यांच्या खासगी जागेवर वनविभागाने माळीणा दरडग्रस्तांचे पुनर्वसन केले होते. ही जागा भाडेतत्त्वावर दोन वर्षांसाठी घेतली होती. शंकर देसले यांच्या मृत्यूनंतर वनविभागाने त्यांचा मुलगा अशोक देसले यांच्यासोबत सामंजस्य करार केला. यावेळी जागेचे भाडे देण्यात येईल असे आश्वासन वनविभागाने दिले होते. मात्र वनविभागाने देसले यांना फुटकी कवडीही दिली नाही. वनविभागाने या दरडग्रस्त कुटुंबीयांकडे पाठ फिरवल्याने त्यांची अक्षरशः दयनीय अवस्था झाली आहे.

विजेचे बिल न भरल्याने विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. परिणामी पिण्याच्या पाण्यासाठी खोदलेली बोअरवेलदेखील बंद झाली आहे. तसेच उदरनिर्वाहासाठी कोणतेही साधन नसल्याने या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.

दरडग्रस्त 20 आदिवासी कुटुंबीयांकरिता तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या निवाऱ्यासाठी वनविभागाने वीजपुरवठा सुरू करून दिला. मात्र वनविभागाने गेल्या सात वर्षांत विजेचे बिल व ग्रामपंचायत घरपट्टीची भरलीच नाही.

ही जागा अशोक देसले यांच्या मालकीची असल्याने महावितरण व ग्रामपंचायतीने देसले यांच्याविरोधात मुरबाड दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यामुळे अशोक देसले आणि आदिवासी कुटुंबीयांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.

साखरमाची गावातील कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी दिलेल्या जागेचे भाडे मिळावे म्हणून
वनविभागाशी सातत्याने पत्रव्यवहार सुरू आहे. परंतु वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या सात वर्षांत एकाही पत्राला उत्तर दिलेले नाही किंवा भाड्याची रक्कमही दिलेली नाही. – अशोक देसले, जागामालक

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

इस्रायलचे गाझावर रात्रभर हल्ले; 50 हून अधिक पॅलेस्टिनी ठार इस्रायलचे गाझावर रात्रभर हल्ले; 50 हून अधिक पॅलेस्टिनी ठार
इस्रायलने गाझा पट्टीत रात्रभर केलेल्या हल्ल्यात 50 हून अधिक पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले. लवकरच इस्रायल गाझामधील मोठय़ा भागावर कब्जा करेल...
लढाऊ विमानाला अपघात; न्यायालयीन चौकशीचे आदेश
अमेरिकेतील हिंदुस्थानीला 35 वर्षांचा कारावास
12, 13 एप्रिलला बीकेसीत कॉमिक कॉन
थोडक्यात – भायखळ्यात शनिवारी रंगणार होम मिनिस्टरचा खेळ
Waqf Amendment Bill 2025 – वक्फ विधेयक लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजूर, 128 विरुद्ध 95 मते
अदानी कर लादल्यामुळे मुंबईकरांवर आर्थिक ताण, कचरा शुल्कावरून आदित्य ठाकरे यांचं पालिका आयुक्तांना खरमरीत पत्र