व्यापार युद्धाच्या धसक्यानं शेअर बाजार धडाम; सेन्सेक्स 800, तर निफ्टी 180 अंकांनी कोसळला, मिनिटभरात लाखो कोटींचा चुराडा

व्यापार युद्धाच्या धसक्यानं शेअर बाजार धडाम; सेन्सेक्स 800, तर निफ्टी 180 अंकांनी कोसळला, मिनिटभरात लाखो कोटींचा चुराडा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी जगभरातील देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ अर्थात परस्पर शुल्क लावण्याची घोषणा केली. ट्रम्प यांनी हिंदुस्थानवरही 26 टक्के आयात शुल्क लावले आहे. याचे थेट पडसाद शेअर बाजारावर उमटले आहे. गुरुवारी बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक म्हणजे सेन्सेक्स 800 अंक, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक म्हणजे निफ्टी 180 अंक कोसळला. यामुळे अवघ्या मिनिटभरामध्ये गुंतवणूकदारांच्या 1.93 लाख कोटी रुपयांचा चुराडा झाला.

हे वाचा – ‘पंतप्रधान मोदी माझे मित्र, पण…’, आधी कौतुक, मग टोमणे मारत डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर लावला 26 टक्के टॅरिफ

बाजार उघडताच विक्रीचा दबाव दिसून आला. सेन्सेक्स 1.05 टक्क्यांनी कोसळून 75,811.12 वर पोहोचला, तर निफ्टी-50 इंडेक्समध्ये 0.75 टक्के अर्थात 182 अंकांनी कोसळून 23, 150.30 वर वर पोहोचला. ऑटो सेक्टरमध्ये 1.25, आयटी सेक्टरमध्ये 1.67 टक्के आणि मेटल्स सेक्टरमध्ये 0.81 टक्के घसरण पहायला मिळाली. तर दुसरीकडे फार्मा सेक्टरमध्ये मात्र 2.95 टक्के वाढ नोंदवण्यात आली.

सेन्सेक्समधील 30 पैकी 24 शेअर लाल

सेन्सेक्सवर लिस्टेड 30 पैकी फक्त 6 शेअर ग्रीन असून इतर सर्व शेअरमध्ये घसरण दिसून आली. सनफार्माचा शेअर सर्वाधिक 5.24 टक्के वाढला असून सर्वाधिक घसरण एचसीएल टेकच्या शेअरमध्ये झाली आहे. हा शेअर 2.21 टक्क्यांनी खाली आला आहे. यासह झोमॅटो, टाटा स्टील, आयटीसी, एसबीआयएन, एचडीएफसी बँक, रिलायन्स, टाटा मोटर्स, टीसीएसच्या शेअरमध्येही घसरण नोंदवलण्यात आली.

हिंदुस्थानवर 26 टक्के आयात शुल्क

डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी व्हाईट हाऊसमधील रोझ गार्डनमध्ये बोलताना जगभरातील देशांवर किती टक्के टॅरिफ लावला याची माहिती दिली. हिंदुस्थान अमेरिकन उद्पादनांवर 52 टक्के आयात शुल्क लावतो, त्यामुळे अमेरिका हिंदुस्थानी मालावर निम्मा अर्थात 26 टक्के आयात शुल्क लावणार आहे, असे ट्रम्प म्हणाले. तर चिनी मालावर 34 टक्के, युरोपियन युनियवर 20 टक्के, जपानवर 24 टक्के, तैवानवर 22 टक्के आणि इस्रायलवर 17 टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचे निधन, 87 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचे निधन, 87 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ भारतीय अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचे शुक्रवारी (4 एप्रिल) सकाळी निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या...
अनधिकृत बांधकामांवरील कारवाई रोखण्यासाठी रिव्हॉल्व्हरचा धाक, KDMC च्या पथकावर मिंधेंच्या माजी नगरसेवकाचा गुंडांसह हल्ला
IPL 2025 – लेफ्ट-राईट-लेफ्ट… SRH च्या गोलंदाजानं एकाच षटकात दोन्ही हातानं बॉलिंग करत KKR ची हवा केली टाईट
Breaking News – ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक मनोज कुमार यांचे निधन
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 4 एप्रिल 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
श्री विठ्ठल मंदिरात नारळ फोडण्यास बंदी
प्रभाकर देशमुख यांची पोलिसांकडून तीन तास चौकशी, मंत्री गोरेप्रकरणी कारवाईचा ससेमिरा