ठुकरा के मेरा प्यार… इकडं ‘मियां मॅजिक’नं RCB ची झोप उडवली, तिकडं मिम्सचा पाऊस पाडला; GT नंही हात धुवून घेतला
पहिल्या दोन सामन्यात मिळवलेल्या विजयामुळे हवेत गेलेले रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे रॉकेट गुजरात टायटन्स संघाने खाली उतरवले. बुधवारी झालेल्या लढतीत गुजारतने यजमान बंगळुरूचा घरच्या मैदानावर अक्षरश: धुव्वा उडवला. एम. चिन्नास्वामी मैदानावर झालेल्या या लढतीत गुजरातने 8 विकेट्सने बाजी मारली.
बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना गुजरातसमोर विजयासाठी 170 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान गुजरातने जोस बटलरच्या वादळी खेळीच्या बळावर 17.5 षटकांमध्ये पूर्ण केले. तत्पूर्वी डीएसपी मोहम्मद सिराजने ‘मियां मॅजिक’ दाखवत आपल्या माजी संघाची बत्ती गुल केली. त्याने बंगळुरूची आघाडीची फळी कापून काढली.
सिराजने 4 षटकात अवघ्या 19 धावा देत 3 महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. त्याने फिल सॉल्ट (14 धावा), देवदत्त पडिक्कल (4 धावा) आणि लियाम लिव्हिंगस्टोन (54 धावा) या स्टार फलंदाजांची शिकार केली. सिराजने सॉल्ट आणि पडिक्कलचा त्रिफळा उडवला, तर लिव्हिंगस्टोनला यष्टीरक्षक जोस बटलरच्या हाती झेलबाद केले. या दमदार कामगिरीबद्दल त्याचा ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List