कोथरुड परिसरात उभा राहणार दुमजली उड्डाणपूल, महामेट्रोकडून बनविण्यात येणाऱ्या पुलाचा खर्च महापालिका उचलणार

कोथरुड परिसरात उभा राहणार दुमजली उड्डाणपूल, महामेट्रोकडून बनविण्यात येणाऱ्या पुलाचा खर्च महापालिका उचलणार

पुणे शहरात वाहतूककोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून कोथरूड, पौड रस्ता आणि चांदणी चौक या भागांमध्ये सकाळ-संध्याकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा ताण असतो. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका आणि महामेट्रोकडून वनाज ते चांदणी चौक या मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणासोबतच कोथरूड परिसरात पौड रस्त्यावर एक नवा दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. हा दुमजली उड्डाणपूल पौड रस्त्यावर कचरा डेपो-टीव्हीएस शोरूमपासून लोहिया आयटी पार्कपर्यंत उभारण्यात येणार आहे. महामेट्रोने याबाबतचा आराखडा पुणे महापालिकेला सादर केला आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 90 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पालिकेकडून या प्रस्तावावर विस्तृत अभ्यास करून योग्य ते बदल सुचवून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

कोथरूड हे पुण्याचे पश्चिम प्रवेशद्वार असून, इथे दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. कोथरूड डेपो परिसर, नळस्टॉप, लोहिया आयटी पार्क या ठिकाणी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते. या उड्डाणपुलाच्या माध्यमातून वाहनांची सततची गर्दी कमी होण्याची शक्यता आहे. हा पूल नळस्टॉप येथे उभारण्यात आलेल्या उडाणपुलाच्या धर्तीवर उभारण्यात येणार आहे. सध्या वनाज ते चांदणी चौक मेट्रो रूटचा प्रस्ताव केंद्राकडे असून अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे या मार्गाला मंजुरी मिळाल्यानंतर उड्डाणपुलाचे कार्यदेखील लगेच सुरू होणार आहे.

पालिकेच्या प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता युवराज देशमुख म्हणाले, महामेट्रोकडून प्रस्तावित दुमजली उड्डाणपुलाचा आराखडा मिळाला आहे. अत्यंत रहदारीच्या या रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी या पुलाचा उपयोग होणार आहे. पालिकेकडून आराखड्यावर अभ्यास करून अपेक्षित बदल सुचविले जातील. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. उड्डाणपुलाचा खर्च पालिकेतर्फे केला जाणार आहे.

शहरातील तिसरा दुमजली उड्डाणपूल

  • नळस्टॉप येथे महामेट्रोने उड्डाणपूल बनविला आहे. पुणे विद्यापीठ चौकामध्येदेखील दुमजली पुलाचे काम सुरू आहे. या दोन्ही पुलांवर सर्वांत वर मेट्रो धावणार असून त्याखालील पूल वाहनांच्या वाहतुकीसाठी उपलब्ध असणार आहे. या दोन दुमजली पुलांनंतर आता पौड रस्त्यावर शहरातील तिसरा दुमजली उड्डाणपूल बनविण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
  • उड्डाणपुलाची एकूण लांबी 715 मीटर, रुंदी 14 मीटर (प्रत्येकी 2-2 लेन), अंदाजे खर्च 90 कोटी रुपये. सर्वांत वरील पूल मेट्रोसाठी, त्याखालील पूल वाहनांसाठी असणार आहे.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पवन कल्याण यांचा मुलगा शाळेतल्या आगीत जखमी; उपमुख्यमंत्र्यांसह चिरंजीवी भेटीसाठी रवाना पवन कल्याण यांचा मुलगा शाळेतल्या आगीत जखमी; उपमुख्यमंत्र्यांसह चिरंजीवी भेटीसाठी रवाना
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मुलगा मार्क शंकर शाळेतल्या आगीत जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर पवन कल्याण...
सुष्मिताच्या आयुष्यात वाईट पुरुषांची एन्ट्री! अभिनेत्री म्हणते, ‘सगळे पुरुष चांगले पण माझ्यासाठी…’
“त्या शोमध्ये जाण्यापेक्षा मेंटल हॉस्पिटल परवडलं”; कुणाल कामराचा थेट नकार
कदाचित तेव्हा ते माझा..; काजोलचा मुलांविषयी खुलासा, सांगितलं चकीत करणारं कारण
शक्तिपीठ महामार्ग मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पिटाळले
कोपरगाव नगरपालिकेच्या जुन्या कचरा डेपोला आग; अथक दीड तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण
सोलापुरात पाच दिवसांआड पाणीपुरवठा; महापालिकेची माहिती