मुस्लिमांचे मालमत्तेचे अधिकार हिरावून घेण्याचे शस्त्र – राहुल गांधी
मुस्लिमांना उपेक्षित ठेवून त्यांचे कायदे आणि त्यांचा जमिनीचा अधिकार हिरावून घेण्यासाठीचे वक्फ सुधारणा विधेयक हे शस्त्र म्हणून वापरण्याचा मोदी सरकारचा डाव आहे, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वक्फ सुधारणा विधेयकावरून मोदी सरकारवर केला. भाजप, आरएसएस आणि त्यांच्या घटक पक्ष तसेच सहकाऱ्यांकडून राज्यघटनेवर हल्ला करण्यात येत आहे. भविष्यात इतर समुदायांना लक्ष्य करण्याचे हे एक उदाहरण आहे, असेही ते म्हणाले. कलम 25 मधील धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार हिरावून घेणाऱया आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या या विधेयकाला काँग्रेसचा कडाडून विरोध राहील, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List