निरोप घेताना आमिरच्या लेकीला अश्रू अनावर; बापाला मिठी मारली अन्, इरा खानचा व्हिडीओ व्हायरल
बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या नव्या नात्यामुळे चर्चेत आहे. दोन घटस्फोटानंतर आता पुन्हा तिसरं अफेअर समोर आल्यानंतर आमिर खानला खूप ट्रोल केलं जात आहे. आमिर खानची नवीन गर्लफ्रेंड ‘गौरी प्रॅट’चे फोटो व्हायरल होत आहेत. पण आता आमिर खान पुन्हा एकदा एका व्हिडीओमुळे आता चर्चेत आला आहे. याचं कारण म्हणजे त्याची लेक इरा खान.
वडिलांचा निरोप घेताना इराला अश्रू अनावर
इरा खानचे 17 मार्च रोजी इरा ही वडील आमिर खानला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहोचली होती. त्याला भेटल्यानंतर ती जेव्हा घरातून बाहेर आली तेव्हा पापाराझींनी तिला रडताना स्पॉट केलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिने गेल्या वर्षी 2024 मध्ये फिटनेस कोच नुपूर शिखरसोबत लग्न केलं होतं. त्यानंतर अनेक दिवसांनी इरा आमिर खानच्या घरी येताना दिसली. तसेच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये इरा खान गाडीत बसलेली दिसत होती. या वेळी त्याचे डोळे अश्रूंनी भरलेले होते.
पापाराझींकडून इराचा भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद
तसेच त्यानंतर आमिर लेकीला काहीतरी समाजवत तिला गाडीत बसवताना दिसत आहे. आमिरच्या घरातून बाहेर पडताना इरा खूप भावनिक दिसत होती. ती तिचे अश्रू रोखण्याचा प्रयत्न करताना दिसली. जेव्हा पापाराझींनी इराचा भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला.
सेलिब्रिटींनाही प्रायव्हसी देण्याची चाहत्यांची विनंती
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहतेही इराच्या या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिले आहे ‘त्यांना थोडीपण प्रायवेसी का मिळत नाही? कारण ते सेलिब्रिटी आहेत म्हणून? ते देखील मानव आहेत हे विसरू नका.” तर दुसऱ्या एका युजरने लिहिले, ‘तिला एकटं सोडा तिला सध्या शांत राहण्याची गरज आहे, यात काय टीआरपी?” अशापद्धतीने चाहत्यांनी पापाराझींना सेलिब्रिटींचाही प्रायव्हसी जपण्याची विनंती केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List