धनश्रीला मिळालेली 4.75 कोटी रक्कम मोठी वाटतेय? मग जगातील ‘या’ महागड्या घटस्फोटाची रक्कम एकदा ऐकाच

धनश्रीला मिळालेली 4.75 कोटी रक्कम मोठी वाटतेय? मग जगातील ‘या’ महागड्या घटस्फोटाची रक्कम एकदा ऐकाच

क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांचा घटस्फोट होत आहे. युझवेंद्र चहलने धनश्री वर्माला 4.75 कोटी रुपये पोटगी देण्याचे मान्य केले आहे. त्यापैकी 2.37 कोटी रुपये त्यांनी आधीच भरले आहेत. धनश्रीने युजवेंद्रकडून 60 कोटी रुपये मागितल्याचा दावा अनेक रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. मात्र, धनश्रीच्या कुटुंबीयांनी हे दावे फेटाळून लावले होते. या घटस्फोटाची चर्चा सुरु असताना जगातील सर्वात महागडे घटस्फोट कोणते असतील? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया जगालीत पाच महागड्या घटस्फोटांबद्दल…

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांनी 27 वर्षे एकत्र राहिल्यानंतर 3 मे 2021 रोजी घटस्फोटाची घोषणा केली होती. अनेक शहरांमध्ये या दाम्पत्याची मालमत्ता होती. या घटस्फोटातून मेलिंडाला 73 अब्ज डॉलर्स मिळाल्याचे समजते. हा जगातील आतापर्यंतचा सर्वात महागडा घटस्फोट आहे. फोर्ब्सच्या अहवालानुसार, घटस्फोटानंतर मेलिंडा गेट्सला विविध कंपन्यांमध्ये किमान 6.3 अब्ज डॉलर्सचे स्टॉक मिळाले.

वाचा: मेगास्टार महेश बाबूचे स्टार अभिनेत्रीशी अफेअर, गुपचूप मुंबईत भेटताना पत्नीने रंगेहाथ पकडलं?

ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आणि त्यांची पत्नी मॅकेन्झी स्टॉक यांचा 2019 मध्ये घटस्फोट झाला. या घटस्फोटाच्या बातम्या खूप चर्चेत होत्या. बेझोस यांना त्यांच्या पत्नीला 38 अब्ज डॉलर्स (भारतीय चलानुसार साधारण तीन लाख चौदा हजार आठशे तीस अब्ज) द्यावे लागले. हा जगातील दुसरा सर्वात महागडा घटस्फोट आहे. स्कॉट आज 36.4 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 45 व्या क्रमांकावर आहे. बेझोस हे 214 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

फ्रेंच-अमेरिकन उद्योगपती आणि आर्ट डीलर ॲलेक वाइल्डनस्टीन यांनी 21 वर्षांच्या लग्नानंतर 1999 मध्ये आपल्या पत्नीपासून घटस्फोटाची घोषणा केली. यासाठी त्याला पत्नी जोस्लिन वाइल्डनस्टीनला 3.8 बिलियन डॉलर इतकी मोठी पोटगी द्यावी लागली. इतिहासातील हा तिसरा सर्वात महागडा घटस्फोट मानला जातो.

मीडिया मोगल रुपर्ट मर्डोक आणि पत्रकार मारिया टॉर्व्ह यांनी लग्नाच्या 31 वर्षांनंतर 1998 मध्ये वेगळे होण्याची घोषणा केली. यासाठी टोर्व यांना 1.7 अब्ज डॉलर्स मिळाल्याचे म्हटले जाते. घटस्फोटानंतर अवघ्या 17 दिवसांनी मर्डोकने वेंडी डेंगशी लग्न केले, तर काही दिवसांनंतर टॉर्वने विल्यम मानलाही आपला जीवनसाथी बनवले.

लास वेगास कॅसिनो किंग स्टीव्ह आणि एलेन विन यांनी अमेरिकेत दोनदा एकमेकांशी लग्न केले. त्यांचे पहिले लग्न 1963 ते 1986 पर्यंत तर दुसरे लग्न 1991 ते 2010 पर्यंत टिकले. असे मानले जाते की दुसऱ्या घटस्फोटादरम्यान, एलियन विनला सुमारे एक अब्ज डॉलर्सची पोटगी मिळाली. आजपर्यंतचा हा जगातील पाचवा सर्वात महागडा घटस्फोट मानला जातो.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भारत सरकारशी पंगा घेऊन खटला जिंकणारे एकमेव अभिनेते; सत्तेच्या तोंडावर नाकारली चित्रपटाची ऑफर भारत सरकारशी पंगा घेऊन खटला जिंकणारे एकमेव अभिनेते; सत्तेच्या तोंडावर नाकारली चित्रपटाची ऑफर
भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक कलाकार आले आणि गेले, परंतु दिग्ग्ज अभिनेते मनोज कुमार यांच्यासारखं दुसरं कोणी नव्हतं. हिंदी सिनेसृष्टीत अनेक हिट...
मनोज कुमार यांचे गाजलेले ‘5’ सिनेमे, मोडले होते सर्व रेकॉर्ड
भारतात शरणार्थी म्हणून आलेल्या मनोज कुमार यांचा सुपरस्टारपर्यंतचा प्रवास
सागर कारंडेंना इन्स्टाग्रामवर लाईक्स मिळवणं पडलं महागात, 61 लाखांची फसवणूक, काय आहे प्रकरण?
गावठी कट्टे, जिवंत काडतुसांसह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त, शेवगाव पोलिसांची कारवाई; आठ आरोपी गजाआड
वादळी पावसाने पुण्याला झोडपले! झाडे पडली, रस्त्यांवर पाणी, वाहतूककोंडी
डोंबिवली-ठाणे प्रवास धोक्याचा; कोपर-दिवा दरम्यान लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू