वक्फ बोर्डाच्या दोन लाख कोटी रुपयांच्या जमिनीच्या सौद्यासाठी हे विधेयक आणलं, संजय राऊत यांचा घणाघात

वक्फ बोर्डाच्या दोन लाख कोटी रुपयांच्या जमिनीच्या सौद्यासाठी हे विधेयक आणलं, संजय राऊत यांचा घणाघात

वक्फ बोर्डाच्या जमिनींची किंमत दोन लाख कोटी रुपये आहे, या जमिनींच्या सौद्यासाठी हे विधेयक आणले आहे असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच गृहमंत्री अमित शहा यांनी या जमिनी विकणार असे जाहीर केले असेही संजय राऊत म्हणाले.

दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या विषयावरती मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहेत. आणि त्यात शिवसेनेच्या भूमिकेविषयी सविस्तर माहिती देतील आणि चर्चा करतील. काल जवळजवळ पहाटे हे वाक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाले. जणू काही देशामध्ये फार मोठी क्रांती करतायत अशा प्रकारे एक माहोल सरकारने आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून निर्माण केला. ते विधेयक मंजूर झाले आणि आमचे सन्माननीय पंतप्रधान काल पहाटे थायलंड, बँकॉकला गेले. या बिलामुळे या देशामध्ये काय होणार आहे आणि यापूर्वी काय झालं? हा सगळा व्यवहार आहे हा मुस्लिमांच्या संपत्तीवर कब्जा मिळवण्याचा आहे. त्याच्यामध्ये फार मोठे महान कार्य नाही. गरीब मुसलमानांचा यातून खूप मोठा उद्धार होणार आहे वगैरे जे काही भाषा काल केली हे पूर्णपणे ढोंग आहे. अडीच लाख कोटीच्यावर ज्या प्रॉपर्टीची किंमत आहे, अशा प्रॉपर्टीवर आपला अधिकार राहावा यासाठी काल हा सगळा खेळ झाला. अल्पसंख्यांक असतील, मुसलमान असतील, त्यांच्या महिला असतील यांचा उद्धार कसा होणार यातून? पण एक काल मात्र अमित शहांच्या पोटातून एक सत्य बाहेर पडलं. त्यांच्या भाषणात जर आपण ऐकलं असेल की 2025 पर्यंतच्या मशिदी, मदरसे, दर्गे याला ते हात लावणार नाही. पण रिक्त जमिनींची विक्री करू आणि त्या पैशातून आम्ही गरीब मुस्लिम महिलांना दान देऊ असे ते म्हणाले. म्हणजे शेवटी खरेदी-विक्री वर आलेले आहेत. शेवटी हे संपत्तीचे रक्षण कर्तेना. काल नकळत त्यांच्या तोंडातून एक सत्य बाहेर पडलं की रिक्त मोकळ्या जमिनींचा आम्ही सौदा करू. या मोकळ्या जमिनींची किंमत दोन लाख कोटी रुपये आहे. आता या मोकळ्या जमिनी कोण कुणाला विकणार आणि कशा पद्धतीने विकणार. जशी धारावीची, मुंबईची विमानतळं, देशभरातील विमानतळं विकण्यात आली. या देशात विकणारे दोनच आहेत आणि विकत घेणार दोनच आहेत. दुसरं कुणाला या जमिनी जाणार आहेत का? म्हणजे हा सगळा खटाटोप मुसलमानांच्या भल्याच्या नावाखाली आहे, हे स्वतः देशाच्या गृहमंत्र्यांच्या तोंडून बाहेर पडलं. काल पर्यंत आम्ही संपत्तीला हात लावणार नाही, ही गरिबांची संपत्ती आहे, आम्ही त्यांचे रक्षण कर्ते आहोत असे ते म्हणत होते. काल त्यांचे हे ढोंग नकळत बाहेर पडलं. या जमिनी त्यांना विकायच्या आहेत, या जमिनीतून त्यांना पैसा मिळवायचा आहे, या जमिनींचा त्यांना व्यापार आणि व्यवहार करायचा आहे. आणि तो सुद्धा आपापसातल्या लोकांमध्येच करायचा आहे. दोन लाख कोटीच्या वरच्या या जमिनी आहेत, कमी नाहीत. आणि त्या जमिनीवर डोळा असल्यामुळेच या लोकांनी हे सगळं काम केलं.

संजय राऊत म्हणाले की हा भ्रष्टाचार आहे. आम्ही या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध मतदान केलं. प्रत्येक विषयावरती हिंदू मुसलमान करायचे. एकेकाळी या देशामधला राष्ट्रीय खेळ हॉकी होता. त्यानंतर आमचे जयभाई शहा, हे क्रिकेटचे सूत्रधार झाल्यावर आपला राष्ट्रीय खेळ क्रिकेट झाला. आणि त्याध्ये सुद्धा हिंदू मुसलमान पण आणले. म्हणजे आता मुसलमानाच्या विरुद्ध मुसलमान लढवला जातोय. जसं आयपीएल मध्ये असतं आणि हिंदूच्या विरुद्ध हिंदू लढवला जातोय. असे एक नवीन धार्मिक आयपीएल सुद्धा लोकांनी सुरू केलं. या बिलाच्या निमित्ताने आपण प्रत्येक ठिकाणी हिंदू आणि मुसलमानाचा खेळ हा नवा राष्ट्रीय खेळ या लोकांनी सुरू केलेला आहे. कालचा विधेयकाचा मसूदा आणि कालची भाषणं जर ऐकली तर त्याच्यामध्ये फक्त संपत्ती, संपत्ती आणि संपत्ती, त्याच्या पलीकडे वेगळं काही नाही. यांना स्वप्नात सुद्धा संपत्ती दिसते. खाता पिता उठताना आणा फक्त जमिनी आणि संपत्ती दिसतात आणि मग ते धार्मिक संपत्ती असेल, सामाजिक संपत्ती, असेल किंवा राष्ट्राची संपत्ती असेल असेही संजय राऊत म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचे निधन, 87 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचे निधन, 87 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ भारतीय अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचे शुक्रवारी (4 एप्रिल) सकाळी निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या...
अनधिकृत बांधकामांवरील कारवाई रोखण्यासाठी रिव्हॉल्व्हरचा धाक, KDMC च्या पथकावर मिंधेंच्या माजी नगरसेवकाचा गुंडांसह हल्ला
IPL 2025 – लेफ्ट-राईट-लेफ्ट… SRH च्या गोलंदाजानं एकाच षटकात दोन्ही हातानं बॉलिंग करत KKR ची हवा केली टाईट
Breaking News – ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक मनोज कुमार यांचे निधन
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 4 एप्रिल 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
श्री विठ्ठल मंदिरात नारळ फोडण्यास बंदी
प्रभाकर देशमुख यांची पोलिसांकडून तीन तास चौकशी, मंत्री गोरेप्रकरणी कारवाईचा ससेमिरा