Salman Khan- ‘माझ्याही चित्रपटाला पाठिंब्याची गरज आहे!’ असं का म्हणाला सलमान खान? वाचा, सविस्तर

Salman Khan- ‘माझ्याही चित्रपटाला पाठिंब्याची गरज आहे!’  असं का म्हणाला सलमान खान? वाचा, सविस्तर

सलमान खानचा ‘सिकंदर’ नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट. परंतु अगदी दोनच दिवसात या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच, बॉक्स ऑफिसवर अस्तित्व सिद्ध करण्यात सपशेल अपयशी ठरला आहे. सलमान खान म्हटल्यावर चाहत्यांच्या अपेक्षाही खूप होत्या. परंतु एकूणच सिकंदर पाहिल्यावर प्रेक्षकांच्या पदरी केवळ निराशाच पडली आहे. तोच तोपणामुळे सलमान खान सध्या चांगलाच ट्रोल होताना दिसत आहे.

चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान सलमानने अतिशय भावनिक मुद्द्याला हात घातला. सलमानने अगदी स्पष्ट सांगितले की, लोकांना असं वाटतं की, मला कुणाच्या पाठिंब्याची गरज नाही. पण असं नसून, मलाही माझ्या चित्रपटासाठी पाठिंब्याची गरज आहे. यावेळी सलमान खानने हे देखील कबूल केले की, तो त्याच्या मित्रांचे आणि सहकाऱ्यांचे चित्रपट कायम प्रमोट करतो. मुलाखती दरम्यान सलमान म्हणाला, “उनको ऐसा लगता होगा की जरूरत नहीं पडती मुझे. पर ऐसा नहीं हैं, सबको जरूरत पडती है.

‘सिकंदर’च्या रिलीजपूर्वी, सलमान खानला आमिर खानकडून पूर्णपणे पाठिंबा मिळाला होता. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, आमिर खान आणि दिग्दर्शक ए.आर. मुरुगदास यांनी प्रमोशनल स्टंट म्हणून मजेदार गप्पा मारल्या. सलीम खान देखील या चर्चेत सामील झाले होते. यावेळी सलीम खान यांनी सलमान आणि आमिर खानच्या आवडत्या चित्रपटांची निवड केली. याच ट्रेलरच्या लाँचच्या वेळी, सलमान खानने नायिका रश्मिका मंदान्ना आणि त्याच्यातील 31 वर्षांच्या वयाच्या अंतराचा मुद्दा उपस्थित केला होता. या मुद्द्यामुळे सलमान चांगलाच चर्चेत आला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचे निधन, 87 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचे निधन, 87 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ भारतीय अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचे शुक्रवारी (4 एप्रिल) सकाळी निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या...
अनधिकृत बांधकामांवरील कारवाई रोखण्यासाठी रिव्हॉल्व्हरचा धाक, KDMC च्या पथकावर मिंधेंच्या माजी नगरसेवकाचा गुंडांसह हल्ला
IPL 2025 – लेफ्ट-राईट-लेफ्ट… SRH च्या गोलंदाजानं एकाच षटकात दोन्ही हातानं बॉलिंग करत KKR ची हवा केली टाईट
Breaking News – ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक मनोज कुमार यांचे निधन
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 4 एप्रिल 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
श्री विठ्ठल मंदिरात नारळ फोडण्यास बंदी
प्रभाकर देशमुख यांची पोलिसांकडून तीन तास चौकशी, मंत्री गोरेप्रकरणी कारवाईचा ससेमिरा