Panchayat Season 4 – पुन्हा एकदा भरणार ‘पंचायत’, फुलेरा गाव अवतरणार आपल्या घरात; तारीख कुठली? वाचा सविस्तर

Panchayat Season 4 – पुन्हा एकदा भरणार ‘पंचायत’, फुलेरा गाव अवतरणार आपल्या घरात; तारीख कुठली? वाचा सविस्तर

ओटीटी जगतामध्ये सर्वाधिक पसंती मिळालेली सीरिज म्हणजेच पंचायत. पंचायतचे पहिले तीनही सीझन गाजलेच नाही तर, या प्रत्येक सीझनमधील पात्रंही तितकीच गाजलेली आहेत. पंचायता पहिला सीझन पाच वर्षांपूर्वी आलेला होता. तरीही आजही या सीझनची लोकप्रियता कुठेही कमी झालेली नाही. पंचायत सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली याला अनेक कारणे आहेत. यातील मुख्य कारण म्हणजे पात्रांची निवड. गावातले गावकरी आणि त्यांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या गुजगोष्टी प्रेक्षकांच्या मनपसंतीस खूपच उतरल्या. पंचायत मधील प्रत्येक फ्रेम म्हणूनच लक्षात राहिली आहेत.

सध्या ओटीटीवर अनेक सीरिजची चलती आहे. असं असलं तरीही पाच वर्षांनी पंचायतची क्रेझ काहीच कमी झालेली नाही. पंचायतच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. प्राइम व्हिडीओने नुकतीच पंचायत सीझन 4 ची घोषणा केलेली आहे. याकरता प्राइम व्हिडीओकडून एक आनंदाची बातमी पंचायतच्या चाहत्यांसाठी मिळालेली आहे. येत्या 2 जुलैला पंचायत पुन्हा एकदा आपल्या घरामध्ये भरणार आहे.

2020 मध्ये सुरू झालेल्या पंचायत या मालिकेला 5 वर्षे पूर्ण होतील. यानिमित्तानेच यंदा येत्या जुलैला चौथा सीझन येतोय. हा सीझनही प्रेक्षकांचे धमाल मनोरंजन करण्यात यशस्वी ठरेल यात काहीच दुमत नाही. फुलेरा गावातील गावकऱ्यांना आता पुन्हा एकदा पाहायला मिळणार असल्याने, प्रेक्षकही खुश झाले आहेत. सीझन 4 मध्ये अभिषेक, प्रधानजी आणि फुलेरा गावकऱ्यांचा मजेदार प्रवास पाहायला मिळणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भारत सरकारशी पंगा घेऊन खटला जिंकणारे एकमेव अभिनेते; सत्तेच्या तोंडावर नाकारली चित्रपटाची ऑफर भारत सरकारशी पंगा घेऊन खटला जिंकणारे एकमेव अभिनेते; सत्तेच्या तोंडावर नाकारली चित्रपटाची ऑफर
भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक कलाकार आले आणि गेले, परंतु दिग्ग्ज अभिनेते मनोज कुमार यांच्यासारखं दुसरं कोणी नव्हतं. हिंदी सिनेसृष्टीत अनेक हिट...
मनोज कुमार यांचे गाजलेले ‘5’ सिनेमे, मोडले होते सर्व रेकॉर्ड
भारतात शरणार्थी म्हणून आलेल्या मनोज कुमार यांचा सुपरस्टारपर्यंतचा प्रवास
सागर कारंडेंना इन्स्टाग्रामवर लाईक्स मिळवणं पडलं महागात, 61 लाखांची फसवणूक, काय आहे प्रकरण?
गावठी कट्टे, जिवंत काडतुसांसह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त, शेवगाव पोलिसांची कारवाई; आठ आरोपी गजाआड
वादळी पावसाने पुण्याला झोडपले! झाडे पडली, रस्त्यांवर पाणी, वाहतूककोंडी
डोंबिवली-ठाणे प्रवास धोक्याचा; कोपर-दिवा दरम्यान लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू