लालूप्रसाद यादव दिल्लीच्या एम्स रुग्णालयात
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांची प्रकृती अचानक बिघडली असून त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 76 वर्षीय लालूप्रसाद यादव यांना कार्डिओ न्यूरो सेंटरमधील कार्डिओ क्रिटीकल केअर युनिटमध्ये दाखल करण्यात आले आहे. एम्सच्या कार्डिओलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ. राकेश यादव यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रात्री 9 वाजून 35 मिनिटांच्या सुमारास त्यांना पाटणा येथील पारस रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List