Male Grooming- पुरुषांनो तुम्हाला ‘ड्रेस वेल’ अशी काॅम्पिलमेंट हवीय का? मग या गोष्टी न विसरता लक्षात ठेवा
पुरुष आणि त्यांचा फॅशन सेन्स याविषयी फार बोललं जात नाही. खूप कमी पुरुषांना कपडे कसे घालावेत याविषयी जागरुकता पाहायला मिळते. त्यामुळेच पुरुष स्वतःही फॅशनच्या बाबतीत सजग पाहायला मिळत नाही. परंतु आत्ताच्या या आधुनिक जगात पुरुषांनीही स्वतःच्या ग्रुमिंगकडे लक्ष देणे हे खूप गरजेचे आहे. फॅशन डिझायनरचे कपडे घालूनच तुम्ही सुंदर दिसाल हा गैरसमज आधी डोक्यातून काढून टाका. स्वस्त आणि खिशाला परवडणाऱ्या कपड्यांमध्येही पुरुषांचे सौंदर्य खुलून दिसते.
पुरुषांसाठी ग्रुमिंग टिप्स
कपड्यांची फिटिंग
कपडे स्वस्त असले तरी त्यांची फिटिंग योग्य असायलाच हवी. उगाच ढगळ कपडे घालून, स्वतःचे हसे करुन घेऊ नका. योग्य फिटिंगच्या कपड्यांमध्ये पुरुष रुबाबदार दिसतात. शर्ट घेताना खांद्याच्या खाली उतरणार नाही याची काळजी घ्यायला हवी. अन्यथा खांदे खाली उतरलेला शर्टमध्ये गबाळ्यासारखे दिसाल.
मनगटावरील घड्याळ
तुमच्या हातानुसार घड्याळ निवडा. ते खूप मोठे किंवा खूप लहान नसावे. आॅफिसवेअर घड्याळ हे सोबर असायला हवे. उगाच रंगीबेरंगी पट्ट्याचे घड्याळ आॅफिसमध्ये सूट होणार नाही. ब्लॅक, ब्लू किंवा ब्राऊन या बेल्टचे घड्याळ सूट होईल याची नोंद घ्यावी.
कपड्यांचे रंग
पुरुष शर्ट किंवा ट्राऊजर घेताना, नेहमी तेच ते कलर्स घेतात. त्यामुळे पुरुषांचा लूक खुलून येत नाही. रंगसंगती ही आकर्षक असली की, पर्सनॅलिटी खुलते. त्यामुळेच रंगांची निवड करताना कायम सजग राहायला हवे. फक्त फेंट शेडस् घेण्यापेक्षा कधीतरी डार्क शेडस् सुद्धा घेणे गरजेचे आहे. म्हणजे तुमच्या एकूणच लूकमध्ये एक छान बदल होईल.
शूज
केवळ कपडे उत्तम घातले म्हणजे ग्रुमिंग झाले असे होत नाही. तर तुमच्या पायातील बुटांकडेही लक्ष द्यायला हवं. सूट किंवा ब्लेझरवर कोणते बूट घालावे हे तुम्हाला समजणे गरजेचे आहे. शिवाय आॅफिसला घालणार असाल ते शूज नियमितपणे स्वच्छ किंवा पॉलिश करायला विसरू नका.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List