Amitabh Bachchan- ‘जो मेरें उत्तराधिकारी होंगे वो मेरे बेटे होंगे’! अमिताभ बच्चन यांच्या ‘एक्स’ सोशल मीडिया माध्यमावरील पोस्टने चर्चांना उधाण!
मिस्टर शहेनशाह म्हणजेच आपले बिग बी नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करत असतात. त्यांना आवडणाऱ्या गोष्टींबद्दल ते कायम त्यांच्या चाहत्यांना अपडेट देत असतात. घरातील अनेक गोष्टींवर सुद्धा अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर भाष्य केलेलं आहे. नुकतंच त्यांनी अभिषेक विषयी सुद्धा एक पोस्ट करत पुन्हा एकदा माध्यमांना चर्चेसाठी विषय दिलेला आहे.
बिग बी यांनी अभिषेक बच्चनसाठी एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे. यासोबतच त्यांनी अभिषेकला नवीन सुरुवात करण्यासाठी शुभेच्छा आणि पाठिंबा दिलेला आहे. हरिवंशराय बच्चन यांचं वाक्य बिग बींनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, मेरे बेटे, बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होगें, जो मेरें उत्तराधिकारी होंगे वो मेरे बेटे होंगे… अशा आशयाची पोस्ट करत बिग बी यांनी केलेली आहे.
T 5323 – मेरे बेटे, बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे, जो मेरे उत्तराधिकारी होंगे वो मेरे बेटे होंगे
पूज्य बाबूजी के शब्द
और ABHISHEK उसे निभा रहे हैं
नीचे भी पढ़िए, एक नयी शुरुआत
— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 19, 2025
इतकेच नाही तर यावेळी अमिताभ बच्चन यांनी अभिषेकला त्याच्या नवीन कामासाठी शुभेच्छाही देऊ केलेल्या आहेत. अभिषेक बच्चनने युरोपियन टी- 20 प्रीमियर लीग (ETPL) मध्ये पैसे गुंतवले आहेत. तो या लीगचा सह-मालक बनला असून, या स्पर्धेत आयर्लंड, स्कॉटलंड, नेदरलँड्ससह जगभरातील अव्वल खेळाडू खेळताना दिसतील. ही लीग 15 जुलैपासून सुरू होईल आणि 3 ऑगस्टपर्यंत चालेल. या ईटीपीएल स्पर्धेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मान्यता दिली आहे.
नुकताच अभिषेक बच्चनचा ‘बी हॅप्पी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. समीक्षक आणि प्रेक्षकांना अभिषेकचे काम खूप आवडत आहे. अमिताभ बच्चन यांनीही त्यांच्या मुलाला मिळत असलेल्या कौतुकावर प्रतिक्रिया दिली आणि लिहिले, अभिषेकच्या बी हॅप्पी चित्रपटाला मिळालेल्या कौतुकाने मी भारावून गेलो आहे. वडिलांसाठी यापेक्षा अभिमानाची गोष्ट दुसरी काहीही असू शकत नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List