महिला खंडपीठासमोर होणार नाही दिशा सालियान मृत्यूप्रकरणाची सुनावणी

सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियान मृत्यूप्रकरणाची सुनावणी आता महिला न्यायाधीशासमोर होणार नाही. वकील निलेश ओझा यांनी याविषयीची माहिती दिली. दिशाचे वडील सतीश सालियान यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि इतरांविरोधात सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार होती. सतीश सालियान यांची याचिका न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सूचीबद्ध करण्यात आली होती. जेव्हा त्यावर सुनावणीला सुरुवात झाली, तेव्हा सालियानचे वकील निलेश ओझा यांनी खंडपीठाला सांगितलं की, “ही याचिका चुकीच्या खंडपीठासमोर मांडण्यात आली आहे.” रोस्टरनुसार महिला आणि मुलांवरील गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणांवरील याचिकांची सुनावणी न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर व्हावी, असं ते म्हणाले. त्यानंतर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांनी सबमिशनचा विचार केला आणि रजिस्ट्री यांना रोस्टरनुसार प्रकरण मांडण्याचे आदेश दिले.
“आता आमच्याकडे दोन पर्याय आहेत. एकतर सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होऊ शकते किंवा चीफ जस्टीसकडे ट्रान्सफर होऊ शकतो. चीफ जस्टीससमोर प्रकरणाची सुनावणी व्हावी अशी आमची इच्छा आहे. न्यायालयाने या खटल्याच्या नोंदीला परवानगी दिली आहे. खटल्याची पुढची तारीख अद्याप ठरलेली नाही. न्यायालयाने खूप लांबली तारीख दिली तर आम्ही लवकर सुनावणी व्हावी यासाठी विनंती करू,” असंही ओझा म्हणाले.
सतीश सालियान यांनी त्यांच्या याचिकेत असा दावा केला की दिशावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. आश्चर्याची बाब म्हणजे पाच वर्षांपूर्वी सतीश सालियान यांनी त्यांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली नव्हती, असा आग्रह धरला होता. दिशाच्या मृत्यूप्रकरणी 25 मार्च रोजी निलेश ओझा यांनी नवीन एफआयआर दाखल केला होता. पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि एफआयआरमध्ये आदित्य ठाकरे, डिनो मोरिया आणि सूरज पांचालो यांची नावं नमूद करण्यात आली आहेत, असं ओझा म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News

Comment List