Chhaava: ‘छावा’ समोर झुकला ‘पुष्पा’, सिनेमाची ३६व्या दिवशीही अपेक्षापेक्षा जास्त कमाई

Chhaava: ‘छावा’ समोर झुकला ‘पुष्पा’, सिनेमाची ३६व्या दिवशीही अपेक्षापेक्षा जास्त कमाई

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान आणले आहे. या चित्रपटातील अभिनेता विकी कौशलने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. फेब्रुवारी १४ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा चांगली कमाई करत आहे. आता चित्रपट प्रदर्शित होऊन ३६ दिवस झाले आहेत. तरीही चित्रपटाची कमाई सुरुच आहे. आता चित्रपटाने किती कमाई केली चला जाणून घेऊया…

‘छावा’ सिनेमाने संपूर्ण देशातील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन ३६ दिवस झाले आहेत. ३६व्या दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २.१० कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता पर्यंत चित्रपटाने एकूण ५७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. विकी कौशलचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. यापूर्वी त्याच्या उरी: द सर्जिकल स्ट्राइक या सिनेमाने बॉक्स ऑफिस गाजवले होते. पण आता या चित्रपटालाही छावाने मागे टाकले आहे. तसेच छावा सिनेमाची कमाई ही दाक्षिणात्य सुपरहिट सिनेमा ‘पुष्पा २’ पेक्षाही जास्त आहे. त्यामुळे येत्या काळात छावा सिनेमा आणखी किती कमाई करणार हे पाहण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.

वाचा: नागपूरच्या राड्याला जबाबदार कोण?; विकी कौशल आणि नितेश राणेंचं नाव घेत अभिनेत्याने केलेले ट्वीट चर्चेत

सिनेमा लीक करणाऱ्यांविरोधात तक्रार

‘छावा’ हा सिनेमा इंटरनेटवर अनधिकृतपणे व्हायरल केल्या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की, १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेला ‘छावा’ हा सिनेमा कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन करून १८१८ इंटरनेट लिंक्स तयार करून बेकायदेशीरपणे उपलब्ध करून देण्यात आला. याचा परिणाम थिएटरमधील वितरणावर झाला आहे. दक्षिण सायबर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 316(2) आणि 308(3) अंतर्गत कॉपीराईट कायद्याच्या कलम 51, 63, आणि 65A सह सिनेमॅटोग्राफ कायदा, 1952 चे कलम 6AA (सुधारणा आणि तंत्रज्ञान अधिनियम 236 आणि माहिती 2360 च्या कलम 360) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

छावा सिनेमाविषयी

‘छावा’ चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवण्यात आली आहे. त्यांची भूमिका अभिनेता विकी कौशलने साकारली. त्यांची पत्नी येसुबाईंची भूमिका अभिनेत्री रश्मिका मंदानाने साकारली आहे तर औरंगजेब ही भूमिका अभिनेता अक्षय खन्नाने साकारली आहे. या चित्रपटात काही मराठी कलाकार देखील दिसले आहेत. त्यामध्ये संतोष जुवेकर, विनीत कुमार सिंह, अक्षय खन्ना आणि आशुतोष राणा यांचा समावेश आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘आता मुस्लीम झाले, पुढे ख्रिश्चन, पारशी अन्…’, जितेंद्र आव्हाड यांचं ते ट्विट चर्चेत ‘आता मुस्लीम झाले, पुढे ख्रिश्चन, पारशी अन्…’, जितेंद्र आव्हाड यांचं ते ट्विट चर्चेत
वक्फ सुधारणा विधेयकाला लोकसभा आणि त्यानंतर राज्यसभेत देखील मंजुरी मिळाली आहे, त्यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते  जितेंद्र आव्हाड...
वक्फ विधेयकावरुन उद्धव ठाकरेंची काँग्रेसपेक्षा वेगळी चूल, थेट म्हणाले ‘आम्ही जाणार…’
‘ती चेटकिण, डायन…’ दिग्दर्शकाने केली श्रद्धा कपूरबद्दल अशी कमेंट; चाहते संतापले
अंकिता लोखंडे-विकी जैनवर आली कपल काऊन्सलिंगची वेळ; वैवाहिक आयुष्यात समस्या?
Chhaava OTT Release: ‘छावा’ सिनेमा OTT वर होणार प्रदर्शित, कधी, कुठे आणि कसा? घ्या जाणून
‘पहिल्यांदा योग्य काम केलं..’; मनोज कुमार यांच्या अंत्यसंस्कारातील अभिषेकच्या व्हिडीओवर कमेंट्स
सीनदरम्यान कपडे घसरले; दिग्दर्शकाने चित्रपटात दाखवला न्यूड सीन; अभिनेत्रीने आयुष्यच संपवलं