हार्दिक पांड्या आणि जस्मिन वालियाच्या नात्यावर शिक्कामोर्तब? अभिनेत्री MI च्या टीम बसमध्ये दिसल्याने चर्चांना उधाण
सोमवारी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात सामना रंगला. वानखेडेवर झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाताचा आठ विकेट्सने दारुण पराभव करत यंदाच्या हंगामातील पहिला विजय मिळवला. यामुळे आता संघ दहाव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. मुंबई इंडियन्सचा सामना पाहण्यासाठी आणि संघाला प्रोत्साहन देण्यासाठी हजारोंच्या संख्येने वानखेडेवर गर्दी लोटली होती. मात्र यावेळी लक्ष वेधलं ते हार्दिक पांड्याची कथित प्रेयसी जास्मिन वालिया हिने. जास्मिन वालिया संघाला आणि हार्दिकला सपोर्ट करण्यासाठी आली होती. सामन्यानंतर ती टीम बसमध्ये देखील दिसली. त्यामुळे सध्या चर्चांना उधाण आले आहे.
IPL 2025 सामन्यांदरम्यान, अनेक खेळाडूंचे कुटुंबीयही स्टेडियममध्ये येतात. त्यांच्यासाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था आहे. आयपीएल फ्रँचायझी हॉटेल ते स्टेडियम किंवा विमानतळापर्यंत प्रवास करण्यासाठी खेळाडूंच्या बससह त्यांच्या कुटुंबासाठी देखीव बसची व्यवस्था असते. दरम्यान हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड जास्मिन वालिया ही देखील खेळाडूंच्या कुटुंबातील सदस्य प्रवास करत असलेल्या बसमध्ये बसलेली दिसली. याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओवर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
जस्मिन वालियाला सामन्यादरम्यान दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही. ती दुबईतील चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल 2025मध्ये दिसली होती. जस्मिनचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता ज्यामध्ये ती स्टेडियममध्ये बसलेली दिसते. स्टेडियममध्ये तिच्या उपस्थितीमुळे त्यांच्या नात्यातील अफवांवर जवळजवळ शिक्कामोर्तब झाला होता.
हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक यांचा घटस्फोट झाला. तब्बल चार वर्ष एकत्र राहून दोन वेळा लग्न करूनही ते विभक्त झाले. या चर्चा ताज्या असतानाच आता हार्दिक पांड्या एका विदेशी गायिकेला डेट करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम लागल्याची चर्चा आहे. प्रसिद्ध ब्रिटीश गायिका जस्मिन वालिया हिच्यासोबत सध्या हार्दिक पांड्याचे नाव जोडले जात आहे. यापूर्वी हार्दिक हार्दिक पांड्याने ज्या ठिकाणचे फोटो शेअर केले आहेत त्याच ठिकाणचे जस्मिन वालियाने फोटो शेअर केले होते. यांनंतर तिने चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल 2025 च्या फायनल सामन्यासाठीही हजेरी लावली होती. त्यामुळे आता हार्दिक आणि जस्मिन खरचं एकमेकांना डेट करतायक का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List