मुंबईकरांचा पाणीसाठा आला 35 टक्क्यांवर, कडक उन्हामुळे तलावांमधील पाणी आटले
कडक उन्हाच्या झळांनी मुंबईकर हैराण झाले असतानाच बाष्पीभवन, गळतीमुळे मुंबईकरांचा पाणीसाठाही अर्ध्याहून कमी झाला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा 5 लाख 7 हजार 445 दशलक्ष लिटरवर म्हणजे एकूण पाणीसाठय़ाच्या 35 टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारच्या धरणातून राखीव पाणीसाठा मिळावा यासाठी पालिकेच्या जल अभियंता विभागाकडून पाठपुरावा सुरू आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, मोडक सागर, भातसा, तानसा, तुळशी आणि विहार या सात धरणांतून दररोज 3 हजार 950 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत 14 लाख 47 हजार 343 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. यंदा फेब्रुवारी महिन्यापासून उकाडय़ाचा मारा सुरू असल्यामुळे 23 फेब्रुवारीला मुंबईचा पाणीसाठा अर्ध्यावर आला होता. त्यात आता एप्रिल महिना सुरू झाल्यामुळे हा साठा अर्ध्याहून कमी म्हणजे 35 टक्क्यांवर पोहोचला आहे.
2 एप्रिलचा उपलब्ध पाणीसाठा
(दशलक्ष लिटर)
अप्पर वैतरणा 96 हजार 715
मोडक सागर 30 हजार 361
तानसा 40 हजार 118
मध्य वैतरणा 76 हजार 937
भातसा 2 लाख 47 हजार 55
विहार 12 हजार 635
तुळशी 3 हजार 625
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List