सोने खरेदीच्या नावाखाली व्यावसायिकाची 1 कोटी रुपयांची फसवणूक
सीमा शुल्क विभाग (कस्टम)ने जप्त केलेले सोन्याच्या वस्तूचा लिलाव केला जातो. लिलावामधील सोने बाजारभावापेक्षा कमी दरात मिळवून देतो असे सांगून व्यावसायिकाची 1 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी वाकोला पोलिसांनी पाचजणांविरोधात गुन्हा नोंद केला.
कुर्ला येथे राहणारे तक्रारदार याचा चिकनचा पुरवठय़ाचा व्यवसाय आहे. 2023 मध्ये त्याची एका मित्राच्या माध्यमातून दोघांशी ओळख झाली होती. ओळखीदरम्यान त्याने कस्टममधील लिलावातील सोने खरेदीचा व्यवसाय असल्याचे सांगितले. बाजारभावापेक्षा कमी दरात सोने मिळत असल्याचे त्याना सांगण्यात आले. आतापर्यंत अनेकांना कमी किमतीत सोन्याचे बिस्कीट दिले आहे. राज्यातील तसेच देशातील अनेक व्यापारी सोने खरेदी करत असल्याचे त्यांना सांगितले.
सोन्यामध्ये गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होईल असे सांगून त्याचा विश्वास संपादन केला. त्याच्याकडे दोन ते तीन कोटी रुपये असून विमानतळावर एक पार्सल आहे. पैसे देऊन ते पार्सल सोडवून त्याला लिलावात स्वस्त दरात खरेदी करायचे असल्याचे त्याना सांगितले. आर्थिक मदतीची विनंतीदेखील त्यांना करण्यात आली. ते पार्सल पाच ते सहा किलो सोन्याचे असून जास्तीत जास्त पैसे जमा करून ते पार्सल सोडवण्याबाबत चर्चा झाली. तक्रारदार याने नातेवाईक आणि मित्राकडून एक कोटी रुपये घेऊन त्या पाच जणांना दिले. ठरल्या मुदतीत त्याना सोने दिले नाही. पैशाची विचारणा केली असता ते टाळाटाळ करू लागले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने वाकोला पोलीस ठाण्यात धाव घेतली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List