उद्धव ठाकरे म्हणाले निरर्थक अधिवेशन, शंभुराज देसाईंनी एका वाक्यात विषय संपवला

उद्धव ठाकरे म्हणाले निरर्थक अधिवेशन, शंभुराज देसाईंनी एका वाक्यात विषय संपवला

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. नुकतंच अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अर्थसंकल्पीय अधिवेशन निरर्थक होतं. अपयश लपवणारं अधिवेशन होतं, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यानंतर आता ठाकरे यांच्या या टीकेला मंत्री शंभूराज देसाई यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले शंभुराज देसाई?

काल विधिमंडळाचं अधिवेशन पूर्ण झालं. जे काही कामकाज झालं ती माहिती दिली. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. अधिवेशनातील कामकाजाला निरर्थक कामकाज झालं असं ते म्हणाले. याचं मला नवलं वाटलं.  आहो पण तुम्ही जर अधिवेशनात भाग घेतला तर तुम्हाला कामकाजाचा अर्थ समजेल. पाहुण्यासारखं यायचं आणि निघून जायचं असं जे करतात त्यांना अर्थ काय कळणार? त्यासाठी पूर्णवेळ सभा गृहात बसावं लागतं. लोकांचे प्रश्न मांडावे लागतात असा टोला यावेळी शंभूराज देसाई यांनी लगावला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की तुम्ही रेकॉर्ड काढून बघा दोघे अधिवेशनात किती वेळा आले. अर्थसंकल्पीय अधिवेशन सर्वात महत्त्वाचं असतं.  यामध्ये ठाकरे पिता पुत्रांनी भाग घेतला नाही, ते फक्त माध्यमांकडे जाऊन टीका करत आहेत. त्यांनी अधिवेशनात भाग घेतला असता तर त्यांना अर्थ कळाला असता. त्यांनी नेहमीप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. खरी शिवसेना माझीच आहे असं ते म्हणाले. उद्धवजींचा आम्ही आदर करतो, पण कायदेशीर मार्गाने आम्ही आमची भूमिका मांडली, पुरावे सादर केले आणि त्याबाबतचा निर्णय निवडणूक आयोगानं सादर केला. न्यायालयानं देखील यात हस्तक्षेप केला नाही.

आम्ही 80 जागा लढलो त्यापैकी 60 जिंकलो , शिवसेना ठाकरे गटाचे फक्त हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच आमदार निवडून आले. लोकांनी त्यांना स्पष्ट सांगितलं, मात्र तरी आपलं तेच खरं अशी त्यांची भूमिका आहे. आज ते लोकांमध्ये जाऊ शकत नाहीत. पदाधिकारी त्यांना सोडून चालले आहेत, असा घणाघात यावेळी शंभूराज देसाई यांनी केला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IMD Monsoon Forecast : मान्सूनबाबत आयएमडीचं मोठं भाकीत, या राज्यांसाठी धोक्याची घंटा, महाराष्ट्राबाबत सर्वात मोठी बातमी IMD Monsoon Forecast : मान्सूनबाबत आयएमडीचं मोठं भाकीत, या राज्यांसाठी धोक्याची घंटा, महाराष्ट्राबाबत सर्वात मोठी बातमी
भारतीय हवामान विभाग(IMD) कडून 2025 च्या मान्सून हंगामाबाबत मोठं भाकीत वर्तवण्यात आलं आहे. आयएमडीनं मान्सून संदर्भात दिलासादायक बातमी दिली आहे....
पतीचा सूड घेण्यासाठी प्रसिद्ध अभिनेत्रीचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर
पहिल्यांदाच खऱ्या फॅक्टरीमध्ये मालिकेचं शूटिंग; श्वेता शिंदेची ‘हुकुमाची राणी ही’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
प्रिती झिंटाची भाची म्हणजे सौंदर्याची खाण, बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं पण…
काय करते जगातील सर्वात श्रीमंत सासूबाईंची सूनबाई, इतक्या कोटींची संपत्ती
सांगली बाजार समितीचे त्रिभाजन; सांगली, जत, कवठेमहांकाळ तीन स्वतंत्र बाजार समित्या
तुझा पूर्ण फोटो पाठव…, नोकरीसाठी धडपडणाऱ्या तरुणीला आला भयंकर अनुभव