ट्रम्प यांचा आश्वासनावरून ‘यू टर्न’! अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांचा रशिया- युक्रेनला अल्टिमेटम

ट्रम्प यांचा आश्वासनावरून ‘यू टर्न’! अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांचा रशिया- युक्रेनला अल्टिमेटम

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचारादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी आश्वासन दिले होते की, सत्ता स्थापन केल्यानंतर ते 24 तासांत रशिया- युक्रेन युद्ध संपवतील. मात्र, आता ट्रम्प यांनी या आपल्या आश्वासनावरच युटर्न घेतला आहे. अमेरिका शांतता प्रस्थापित होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. जर आगामी तीन चार महिन्यात त्यात यश मिळाले नाही तर ट्रम्प शांततेसाठीचे प्रयत्न सोडीन देतील, असा इशारा अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी रशिया आणि युक्रेनला दिला आहे.

आता ट्रम्प यांच्याकडून सांगण्यात आले की, एप्रिल-मे पर्यंत शांततेसाठी महत्त्वाचा करार होऊ शकतो. तसेच जर शांतता करार झाला नाही तर ट्रम्प त्यांचे प्रयत्न सोडून देतील,असेही रुबियो यांनी स्पष्ट केले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी शुक्रवारी रशिया आणि युक्रेन दोघांनाही अल्टिमेटम दिला. ते म्हणाले की, जर रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता करार होऊ शकतो असे स्पष्ट संकेत मिळाले नाहीत, तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काही दिवसांत रशिया-युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सोडून देतील.

आता आपल्याला खूप लवकर निर्णय घेण्याची गरज आहे. आगामी महिन्यात शांततेसाठी ठोस पावले टाकण्यात आली तर आम्ही त्यात सहभागी आहोत. जर तसे झाले नाही, तर ट्रम्प यांना यातून माघार घ्यावी लागेल. हे युद्ध थांबवण्यासह अमेरिकेला अनेक गोष्टींकडे लक्ष केंद्रित करावे लागेल. ट्रम्प हे युद्ध थांबवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र, शांतता स्थापनेच्या दृष्टीने प्रगतीची काही चिन्हे दिसली नाहीत तर ते माघार घेणार आहेत, असे रुबियो यांनी स्पष्ट केले.

सध्या, रशिया आणि युक्रेनमध्ये ऊर्जा युद्धबंदी करार आहे, ज्या अंतर्गत दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या ऊर्जा प्रतिष्ठानांवर 30 दिवसांसाठी हल्ला थांबवण्याचे मान्य केले आहे. सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे रशिया-युक्रेन शांतता कराराच्या चर्चा सुरू आहेत. या संवादात अमेरिका महत्त्वाची भूमिका बजावत आहे आणि दोन्ही पक्षांशी बोलत आहे. या प्रयत्नात ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवरूनही चर्चा केली.

ट्रम्प यांच्या प्रयत्नांमुळेच रशिया आणि युक्रेनमध्ये ऊर्जा युद्धबंदीचा करार झाला. ट्रम्प यांना कोणत्याही प्रकारे या महिन्याच्या अखेरीस दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी करयची आहे. मात्र, दोन्ही देशांकडून हल्ले सुरूच आहेत. ट्रम्प यांनी युद्ध थांबवण्याच्या केलेल्या प्रयत्नांमुळे जगात आशा निर्माण झाल्या होत्या, परंतु रुबियो यांच्या या वक्तव्यामुळे युद्ध थांबणार की नाही, अशी साशंकता व्यक्त होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वक्फ बोर्डाच्या विधेयकास विरोध का केला? उद्धव ठाकरे यांनी सांगितले कारण वक्फ बोर्डाच्या विधेयकास विरोध का केला? उद्धव ठाकरे यांनी सांगितले कारण
संसदेत संमत झालेल्या वक्फ बोर्डाच्या विधेयकास शिवसेना उबाठाने विरोध केला होता. त्यानंतर शिवसेना उबाठावर टीका होऊ लागली होती. शिवसेना कामगार...
Jain Community Protest : जैन समाजाचा आजपर्यंत कधी आवाज ऐकला होता का? वर्षा गायकवाड यांचा सवाल
जेवण नव्हतं, 2oवर्ष फक्त 500 रुपयांवर हॉटेलमध्ये काम केलं; अन् आज अभिनेत्री कोट्याधीश
स्वतःच्या आनंदासाठी मी दुसऱ्या महिलेचे…; शबाना आझमी यांचा लग्नाबाबत खळबळजनक खुलासा
‘पुरुषांना मासिक पाळी आली असती तर…’, तिरस्काराने दुर्लक्ष करणाऱ्या पुरुषांवर जान्हवीने साधला निशाणा
तेच हसणं, तिच्यासारखेच हावभाव, तोच आवाज; तरुणीने केली प्राजक्ता माळीची हुबेहूब नक्कल, व्हिडीओ व्हायरल
‘भगवद्गीता’ आणि ‘नाट्यशास्त्रा’चा युनेस्कोच्या ‘जागतिक स्मृती रजिस्टर’मध्ये समावेश ; देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा