आजी आजोबांनी पुसला निरक्षरतेचा शिक्का, चंद्रपुरात वृद्ध नागरिक देणार परीक्षा

आजी आजोबांनी पुसला निरक्षरतेचा शिक्का, चंद्रपुरात वृद्ध नागरिक देणार परीक्षा

शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते. केवळ शिकण्याची आवड हवी. याच आवडीपोटी अनेक वृद्धांनी साक्षर होण्यासाठी चक्क परीक्षा दिली आणि निरक्षरतेचा शिक्का पुसला.

केंद्र सरकारच्या नवभारत साक्षरता अभियानाने हे साध्य केले. किमान अक्षर, संख्या ओळख व्हावी, हा यामागील उद्देश आहे. यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यातील 16 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेमध्ये पंधरा वर्षांवरील निरक्षर सहभागी होऊ शकतात.  ज्यांना वाचन, लेखन, संख्याज्ञान माहिती नाही, अशा लोकांना स्वयंसेवकाच्या माध्यमातून वर्षभर शिकवले जाते. आणि मग त्यांची रीतसर परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा काल पार पडली. यात वयोवृद्ध नवसाक्षर विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. आयुष्यभर जे लोक निरक्षर म्हणून जगले, अशांनी हा डाग पूसत साक्षरतेचा गौरव प्राप्त केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

….तर संतोष देशमुख जीवंत असते, काय म्हणाल्या अंजली दमानिया ? ….तर संतोष देशमुख जीवंत असते, काय म्हणाल्या अंजली दमानिया ?
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरु आहे. कोर्टात आरोपी सुदर्शन घुलेचा जबाब सादर करण्यात आला आहे...
धनंजय मुंडे यांची पत्नी असल्याचे करुणा शर्मांकडे कोणते पुरावे? यादीच समोर
मोठी बातमी! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट, राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय
शाहरुखच्या मुलाला तुरुंगात कोण पुरवायचं सिगरेट, पाणी? गुंडांपासून आर्यनला होता धोका
परिणीती चोप्राचे पती राघव चड्ढालाही घिबलीची भूरळ; पत्नीसोबतचे गोंडस फोटो शेअर
एका क्रांतिकारी युगपुरुषाचा गौरव; ‘फुले’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर पाहिलात का?
सोनम कपूरची बहिण सोने व्यावसायिकाच्या प्रेमात वेडी; लवकरच करणार बॉलिवूड एन्ट्री